ते कोणत्या रस्त्याबद्दल बोलताहेत?, त्यांच्या मतदारसंघाविषयी तर बोलत नाहीत ना?; श्रीकांत शिंदेंचा कपिल पाटलांना टोला

पाटील यांच्या या टीकेवर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पलटवार केला आहे. ते कोणत्या रस्त्याबद्दल बोलत आहेत हे मला माहीत नाही. माझ्या मतदारसंघातील कल्याण-शीळ रस्त्याचे काम सुरू आहे. तसेच कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या कामांसाठी 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

ते कोणत्या रस्त्याबद्दल बोलताहेत?, त्यांच्या मतदारसंघाविषयी तर बोलत नाहीत ना?; श्रीकांत शिंदेंचा कपिल पाटलांना टोला
श्रीकांत शिंदेंचा कपिल पाटलांना टोला

कल्याण/शहापूर, अमजद खान/सुनील घरत  : केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणमधील रस्त्यांच्या कामावरून शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. पाटील यांच्या या टीकेवर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पलटवार केला आहे. ते कोणत्या रस्त्याबद्दल बोलत आहेत हे मला माहीत नाही. माझ्या मतदारसंघातील कल्याण-शीळ रस्त्याचे काम सुरू आहे. तसेच कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या कामांसाठी 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अंबरनाथ, उल्हासगनगरातही विकासकामे सुरू आहेत, असं सांगतानाच ते त्यांच्या मतदारसंघाविषयी तर बोलत नाहीत ना?; असा टोला श्रीकांत शिंदे यांनी पाटील यांना लगावला. (MP Shrikant Patil slammed Union Minister of State Kapil Patil)

कपिल पाटील यांनी कल्याण-शीळ रस्त्यावरुन काढली होती यात्रा

16 ऑगस्ट रोजी कल्याण शीळ रस्त्यावरुन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्र काढण्यात आली होती. रस्त्याच्या कामाविषयी पत्रकारांनी राज्यमंत्री पाटील यांना प्रश्न उपस्थीत केला होता. त्यावेळी कल्याण शीळ रस्त्याचे काम निकृष्ट झाले असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल असे पाटील यांनी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आज खासदार डॉ. शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

19 ऑगस्ट रोजी शहापूरमध्ये जन आशिर्वाद यात्रा

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा 19 ऑगस्ट रोजी शहापूरमध्ये असणार आहे. शहापूर सापगाव या रस्त्यावरुन ही यात्रा जाणार आहे. सापगाव – शहापूर रस्त्याची चाळण झाली आहे. हे खड्डे काल सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत तात्काळ बुजवण्यात आले होते. मात्र पावसाने 24 तासाच्या आत या रस्त्यावरील खड्डे धुवून गेले असल्याने रस्ता जैसे थे झाला आहे. (MP Shrikant Patil slammed Union Minister of State Kapil Patil)

इतर बातम्या

मुंबईतील पालिका, शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद, लस उपलब्ध नसल्यामुळे निर्णय

संपादक असल्याची बतावणी करुन 4 लाखांचा गंडा, बारामतीत तोतया पत्रकारावर गुन्हा दाखल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI