Ganeshotsav : विसर्जन घाटावरील अत्यावश्यक कामे तातडीने करा, महापालिका आयुक्तांचे आदेश

Ganeshotsav : गणेश मूर्तीचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यादृष्टीकोनातून महापालिकेने एकूण 7 मोठे विसर्जन घाट तयार केले आहेत. या ठिकाणी छोटया गणेश मूर्तीबरोबर मोठया आकाराच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Ganeshotsav : विसर्जन घाटावरील अत्यावश्यक कामे तातडीने करा, महापालिका आयुक्तांचे आदेश
विसर्जन घाटावरील अत्यावश्यक कामे तातडीने करा, महापालिका आयुक्तांचे आदेशImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 5:50 PM

ठाणे : गणेश उत्सवाच्या (ganeshotsav) पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा (vipin sharma) ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने (thane municipal corporation) तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची व विसर्जन घाटांची आज विपिन शर्मा यांनी पाहणी केली. प्रत्येक विसर्जन घाटावरील अत्यावश्यक कामे तातडीने करण्याचे निर्देश देतानाच यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिका यंत्रणा सज्ज असल्याची माहिती शर्मा यांनी दिली. गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये यासाठी महापालिकेच्यावतीने ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा यावर्षी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरोनाची खबरदारी म्हणून महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक विसर्जन ठिकाणी अँन्टीजन चाचणी केंद्र उभारण्यात येणार आहे. बुस्टर डोस देण्याचीही व्यवस्था तिथे करण्यात येणार आहे.

आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज सकाळी उपवन तलाव विसर्जन घाट येथून कृत्रिम तलावांची व विसर्जन घाटांची पाहणी करण्यास सुरुवात केली. यावेळी माजी महापौर नरेश गणपत म्हस्के, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता जाधव, अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

तात्काळ खड्डे बुजवा

शहरातील उपवन तलाव, कोलशेत महाविसर्जन घाट, पारसिक रेतीबंदर, मुंब्रा, मासुंदा तलाव, कोपरी व रायलादेवी तलाव आदी ठिकाणच्या विसर्जन व्यवस्थेची शर्मा यांनी पाहणी केली. यावेळी गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मार्गावर पडलेले खड्डे तसेच शहरात इतर ठिकाणी रस्त्यांना पडलेले खड्डे तातडीने बुजविणेसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी बांधकाम विभागास दिले. तसेच विसर्जन घाटावर आवश्यक ती यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देणे, विद्युत व्यवस्था, गणेशमूर्ती विसर्जन ठिकाणी निर्माल्य कलशाची व्यवस्था करणे, गणेशमूर्ती विसर्जन फिरते स्विकृती केंद्रासाठी, निर्माल्य वाहतुकीसाठी लागणाऱ्या वाहनांची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यानी संबंधितांना दिले आहेत.

फिरती विसर्जन व्यवस्था

गणेश मूर्तीचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यादृष्टीकोनातून महापालिकेने एकूण 7 मोठे विसर्जन घाट तयार केले आहेत. या ठिकाणी छोटया गणेश मूर्तीबरोबर मोठया आकाराच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. श्री गणेश मूर्तीच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने कृत्रीम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ज्या भाविकांना विसर्जन घाट किंवा कृत्रीम तलावांच्या ठिकाणी मूर्तींचे विसर्जन करता येणे शक्य नाही त्यांच्यासाठी महापालिका गणेश मुर्ती स्वीकार केंद्रे उभारणार आहे. तसेच प्रभाग समितीतंर्गत फिरती विसर्जन व्यवस्था असणार आहे.

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.