Kalyan : पलावा सिटीतील प्लॅटधारकांच्या मालमत्ता करात सूट देण्याचा प्रश्न महिनाभरात मार्गी लागणार

पलावा ही इंटीग्रेटेड टाऊनशीप आहे. या टाऊनशीपला मान्यता देताना सरकारने बिल्डरला काही सवलती दिल्या होत्या. त्याचप्रमाणे त्याठिकाणी घरे घेणाऱ्या मालमत्ताधारकास त्याच्या मालमत्ता करात 66 टक्के सूट दिली जाणार होती.

Kalyan : पलावा सिटीतील प्लॅटधारकांच्या मालमत्ता करात सूट देण्याचा प्रश्न महिनाभरात मार्गी लागणार
पलावा सिटीतील प्लॅटधारकांच्या मालमत्ता करात सूट देण्याचा प्रश्न महिनाभरात मार्गी लागणार
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 10:06 PM

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत असलेल्या पलावा सिटीतील 25 हजार प्लॅट धारकांना मालमत्ता करात 66 टक्के सूट देण्याचा सरकारचा जीआर असताना त्याची अंमलबजावणी का केली जात नाही असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी आज कर विभाग प्रमुख विनय कुलकर्णी यांची भेट घेऊन उपस्थित केला. यावेळी हा विषय येत्या महिनाभरात मार्गी लागणार असल्याचे कुलकर्णी यांनी आमदार पाटील यांना आश्वासित केले आहे.

प्लॅटधारकांकडून जवळपास 15 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला

आमदार पाटील यांनी कर विभाग प्रमुख कुलकर्णी यांची आज भेट घेतली. यावेळी मनसेचे पदाधिकारी प्रकाश भोईर, हर्षद पाटील, संघर्ष समितीचे पदाधिकारी गजानन मांगरुळकर आदी उपस्थित होते. यासंदर्भात आमदार पाटील यांनी सांगितले की, पलावा ही इंटीग्रेटेड टाऊनशीप आहे. या टाऊनशीपला मान्यता देताना सरकारने बिल्डरला काही सवलती दिल्या होत्या. त्याचप्रमाणे त्याठिकाणी घरे घेणाऱ्या मालमत्ताधारकास त्याच्या मालमत्ता करात 66 टक्के सूट दिली जाणार होती. त्याचा जीआर सरकारने 2016 साली काढला आहे. महापालिकेने सूट दिलेली नाही. 25 हजार प्लॅटधारकांकडून जवळपास 15 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. प्लॅटधारकांनी जवळपास 10 कोटी रुपये जास्तीचा कर वसूल केला आहे. 66 टक्के सूट दिली जावी याकडे लक्ष वेधले आहे.

महिनाभरात हा विषय मार्गी लागणार

यासंदर्भात कर विभागाचे प्रमुख कुलकर्णी यांनी आमदार पाटील यांना सांगितले की, या विषयीचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे पाठविला होता. कारण टाऊनशीपला परवानगी एमएमआरडीएने दिली होती. त्यांच्याकडून पत्र आले आहे. सूट देण्याचा विषय हा धोरणात्मक असल्याने त्याची पहिली बैठक अतिरिक्त आयुक्त स्तरावर येत्या 13 जानेवारी रोजी घेतली जाणार आहे. त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाईल. महिनाभरात हा विषय मार्गी लागणार आहे. तसेच 27 गावातील मालमत्ताधारकांना जास्तीचा कर लावला जात आहे. सरसकट कर आकारणी न करता नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर 27 गावातील मालमत्ताधारकांना कर आकारणी करण्यात यावी अशी मागणी आमदार पाटील यांनी यावेळी केली आहे. (The issue of property tax exemption for plot holders in Palawa City will be resolved within a month)

इतर बातम्या

ताडीच्या अतिसेवनाने घात, डोंबिवलीत दोघा मित्रांचा मृत्यू, रुग्णालयात जाईपर्यंतच प्राण सोडले

‘आई आता आपण काय करायचं गं?’ अपघातात दगावलेल्या सलीलच्या मुलाचा सवाल, कुटुंब संकटात!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.