चोरी करायला गेला अन् इमारतीवरून पडला; डोंबिवलीत चोरट्याचा झाला मृत्यू; पकडल्या जाण्याच्या भीतीनं जीव गमावला

चोरी करायला गेला अन् इमारतीवरून पडला; डोंबिवलीत चोरट्याचा झाला मृत्यू; पकडल्या जाण्याच्या भीतीनं जीव गमावला
उल्हासनगरमध्ये विधेवर कात्रीने केला हल्ला
Image Credit source: tv9

इमारतींमधल्या घरात जाऊन तिथले दरवाजे, ग्रील, नळ, वायरिंग चोरटे चोरून घेऊन जात आहेत. त्यामुळं या इमारतींबाहेर सुरक्षारक्षक नेमण्यात आला आहे. मात्र या सुरक्षारक्षकाची नजर चुकवून सोमवारी रात्री मोहम्मद सलीम भाटकर आणि अरफान पिंजारी हे दोन चोरटे चोरी करण्यासाठी इमारतीत घुसले होते.

निनाद करमरकर

| Edited By: महादेव कांबळे

May 17, 2022 | 9:23 PM

ठाणे: डोंबिवलीत (Dombivli) एका चोरट्याला पकडल्या जाण्याच्या भीतीनं इमारतीवरून पडून मृत्यू (Death by falling from a building) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मृत तरुणांसह त्याच्या साथीदारावर चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल (Filed a crime) केला आहे. डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात केडीएमसीनं बीएसयूपी योजनेअंतर्गत शहरी गरीबांसाठी इमारती उभारल्या आहेत. या इमारतींमधील सदनिकांचा अद्याप लाभार्थ्यांना ताबा देण्यात आला नसल्याने या इमारती रिकाम्या पडून आहेत. याचाच फायदा घेत गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरट्यांनी या इमारतींकडे मोर्चा वळवला आहे.

इमारतीचे साहित्याची चोरी

या इमारतींमधल्या घरात जाऊन तिथले दरवाजे, ग्रील, नळ, वायरिंग चोरटे चोरून घेऊन जात आहेत. त्यामुळं या इमारतींबाहेर सुरक्षारक्षक नेमण्यात आला आहे. मात्र या सुरक्षारक्षकाची नजर चुकवून सोमवारी रात्री मोहम्मद सलीम भाटकर आणि अरफान पिंजारी हे दोन चोरटे चोरी करण्यासाठी इमारतीत घुसले होते.

पाईपवरुन खाली उतरण्याचा प्रयत्न

ही बाब सुरक्षारक्षकाच्या लक्षात येताच सुरक्षारक्षकाने त्यांचा पाठलाग करत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पकडले जाण्याच्या भीतीनं या दोघांनी इमारतीच्या पाईपला पकडून खाली उतरायला सुरुवात केली. या प्रयत्नात मोहम्मद हे दोघेही खाली कोसळले आणि यापैकी मोहम्मद भाटकर या चोरट्याचा मृत्यू झाला. तर अरफान पिंजारी हा चोरटा जखमी झाला आहे.

चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

या घटनेनंतर टिळकनगर पोलिसांनी या दोघांच्या विरोधात चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यातील मृत मोहम्मद सलीम भाटकर हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांनी दिली आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें