नर्सकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या डॉक्टरला एक लाखाचा दंड; विशाखा समितीच्या अहवालातील निष्कर्ष गुलदस्त्यात

स्टाफ नर्सकडे शरीर सुखाची मागणी करणारा डॉक्टर विश्वनाथ केळकर याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (vishakha samiti imposes fine of 1 lakh rupees to thane doctor)

नर्सकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या डॉक्टरला एक लाखाचा दंड; विशाखा समितीच्या अहवालातील निष्कर्ष गुलदस्त्यात
राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 11:00 AM

ठाणे: स्टाफ नर्सकडे शरीर सुखाची मागणी करणारा डॉक्टर विश्वनाथ केळकर याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विशाखा समितीने महापालिका आयुक्तांकडे चौकशी अहवाल सादर केल्यानंतर हा दंड ठोठावण्यात आला आहे. (vishakha samiti imposes fine of 1 lakh rupees to thane doctor)

मार्च 2020मध्ये ठाणे महापालिकेने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी साकेत येथे ग्लोबल कोविड सेंटरची निर्मिती केली होती. पालिकेने या हॉस्पिटलची सर्व सूत्रे पालिकेचे उपायुक्त डॉ. विश्वनाथ केळकर यांच्याकडे सोपवले होते. मात्र, एका नर्सने केळकर यांच्यावर त्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. त्यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप या महिलेने केला हाोता. याप्रकरणी पोलिसात तक्रारही नोंदवण्यात आली होती. या घटनेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सदर नर्सची भेट घेऊन संपूर्ण माहिती घेतली होती. त्यानंतर वाघ यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन दोषी डॉक्टरावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आयुक्तांनी या प्रकरणाची विशाखा समिती मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

चित्रा वाघ काय म्हणाल्या होत्या?

“डॉ. विश्वनाथ केळकर यांनी पीडित मुलीला आधी ठाणे महापालिका क्षेत्रात आरोग्य विभागात स्टाफ नर्समधून बढती दिली. त्यानंतर त्यांनी मुलीचा छळ केला. तिला कामावरून काढून टाकले. केळकर यांनी मुलीसोबत अश्लील भाषेत बातचित केली. मुलीला गेल्या दोन महिन्यांपासून न्याय मिळालेला नाही”, असं चित्रा वाघ पत्रकार परिषदेत म्हणाल्या होत्या.

न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही

तसेच “पीडित मुलगी न्याय मिळवण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेली होती. पण पोलिसांनी तिची दिशाभूल करण्याचे काम केले. दुसरीकडे जी विशाखा कमिटी नेमली आहे ती कमिटीदेखील डॉ विश्वनाथ केळकर यांनी नेमली आहे. विशेष म्हणजे पालिका आयुक्तांनी याची दखल घेतली नाही. जोपर्यंत डॉ. केळकर यांना कामावरून काढत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत”, असा पवित्रा चित्रा वाघ यांनी घेतला होता.

का आहे प्रकरण?

मार्च 2020मध्ये साकेतमध्ये ग्लोबल हॉस्पिटलची उभारणी करण्यात आल्यानंतर या हॉस्पिटलमध्ये सदर नर्सची जून 2020मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. तिचे काम बघून तिला असिस्टंट मेट्रेन करण्यात आले होते. मात्र, वर्षभरानंतर तिच्या कागदपत्रातील त्रुटी दाखवून तिला तिची पदोन्नती काढून घेण्यात आली. मात्र, सदर डॉक्टरने शरीर सुखाची मागणी केली होती, ती नाकारल्यानेच त्याने आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप या नर्सने केला होता.

अहवालात नेमकं काय?

दरम्यान, विशाखा समितीने या प्रकरणाचा चौकशी अहवाल महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना सादर केला आहे. या समितीने डॉक्टरला एक लाखाचा दंड ठोठावला असला तरी अहवालातील निष्कर्ष मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहेत. (vishakha samiti imposes fine of 1 lakh rupees to thane doctor)

संबंधित बातम्या:

मित्राची हत्या करुन खिशातल्या पाचशे रुपयांची दारु आणली, गावभर बोंबलले ‘आज दो लोगो को टपका डाला’

Maharashtra News LIVE Update | कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मुलीचा मृत्यू

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या 25 हजारांच्या घरात, सक्रिय रुग्णसंख्येतही घट

(vishakha samiti imposes fine of 1 lakh rupees to thane doctor)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.