ठाणे

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानीचे शहर असलेल्या मुंबईच्या सीमेला लागूनच ठाणे जिल्हा आहे. रस्ते आणि लोकल वाहतुकीमुळे हा जिल्हा झपाट्याने विकसित झाला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा जिल्हा असल्याने या जिल्ह्याचे अलिकडेच विभाजन झाले आणि ठाण्यापासून स्वतंत्र अशा पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. ठाणे जिल्ह्याची विविध अर्थाने ओळख आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी सर्व मोठी तलावे ही याच जिल्ह्यात आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार ठाणे हा लोकसंख्येच्या दृष्टिने राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 4214 चौ.कि.मी. असून ते राज्याच्या 1.37 टक्के आहे. पूर्वेकडे सहयाद्री पर्वताच्या रांगा तर पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस गुजरात राज्याचा घनदाट अरण्याचा भाग आणि दक्षिणेला मुंबई शहर अशी ठाण्याची सीमा आहे. जिल्हयातील ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास झाला आहे. राज्याच्या 720 कि.मी. किनाऱ्यांपैकी 27 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा जिल्हयाला लाभला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक कुटुंबांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. पर्यटनस्थळांची संख्याही अधिक असून अनेक महत्वाची धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ तितकीच असून त्याची स्थानिकांच्या रोजगारासाठी मोठी मदत होत आहे. ठाण्यात भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण ग्रामीण, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याणपूर्व, डोंबिवली, कल्याण पश्चिम, मीरा भाईंदर, ओवळा माजीवडा, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे शहर, मुंब्रा-कळवा, ऐरोली आणि बेलापूर हे 18 मतदारसंघ येतात.

जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.

पुढे वाचा

कल्याण डोंबिवलीकरांची उत्कंठा शिगेला, अर्थसंकल्पाच्या पोतडीतून आज काय निघणार?

ठाणे Thu, Mar 23, 2023 10:11 AM

मनसे म्हणते, राज ठाकरे भावी मुख्यमंत्री; जितेंद्र आव्हाड म्हणाले, मग मी जनतेच्या मनातील पंतप्रधान

ठाणे Wed, Mar 22, 2023 03:16 PM

राज ठाकरे यांच्या सभेआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनसेच्या कार्यालयाला भेट; राजकीय संकेत काय?

ठाणे Wed, Mar 22, 2023 12:31 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे भावूक, मुलगा श्रीकांत आईजवळ येऊन बसले, काय घडलं?

ठाणे Mon, Mar 20, 2023 09:03 AM

आढेवेढे नाही, साकडे, अर्जव नाही, महादेव जानकर खुल्लम खुल्ला बोलले; म्हणाले, आपल्याच चौकात, आपली…

ठाणे Sun, Mar 19, 2023 11:43 AM

किसान सभेच्या लाँग मार्चमधील शेतकऱ्याचा मृत्यू कोणत्या कारणामुळे? रूग्णालयाबाहेर आंदोलकांची गर्दी

ठाणे Sat, Mar 18, 2023 07:39 AM

रुग्णवाहिका फिरवून घेताना धक्का लागला; फेरीवाल्यांचे धक्कादायक कृत्य

ठाणे Fri, Mar 17, 2023 07:43 AM

जलकुंभाचं पाईप गंजून तुटून पडलं; या वसाहतीत इतके दिवस मिळालंच नाही पाणी

ठाणे Thu, Mar 16, 2023 04:27 PM

वर्गात घुसला साप, सापाला पाहून शिक्षक विद्यार्थ्यांची उडाली तारांबळ

ठाणे Wed, Mar 15, 2023 02:54 PM

महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी भर मध्यरात्री डोंबिवलीत टाकलेली धाड फोल ठरली? महत्त्वाची माहिती आली समोर

ठाणे Tue, Mar 14, 2023 11:08 PM

मनपाचे पाणी चोरून उभारला मिनरल वॉटरचा कारखाना; मंत्र्यांनी धाड मारून केली ही कारवाई

ठाणे Tue, Mar 14, 2023 11:40 AM

शहरात जनावरांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास मर्यादा; या कामासाठी स्वयंसेवी संस्था पुढाकार घेणार?

ठाणे Tue, Mar 14, 2023 10:49 AM

अतिरिक्त रेती उत्खननाने रेल्वे ट्रॅक खचण्याची भीती; दुर्घटना घडल्यावर गांभीर्याने घेणार का?

ठाणे Tue, Mar 14, 2023 08:54 AM

या शहरात एकच शिवसेना असेल!; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काय सांगितलं

ठाणे Mon, Mar 13, 2023 01:19 PM

डोंबिवलीतल्या पालिकेच्या शाळेची धोकादायक अवस्था, विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

ठाणे Sun, Mar 12, 2023 03:48 PM

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI