नागमणीच्या आमीषाने लुटणारे आरोपी अटकेत

रायगड: इच्छापूर्ती नागमणी असल्याचे भासवून नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर दोन जण फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सुशांत नामदेव मोरे (33), मरकाम कालीदास राजपूत (35) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावं आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात आली. महाड तालुक्यातील टोळ फाटा येथे इच्छापूर्ती नागमणी असल्याचा दावा करुन, …

नागमणीच्या आमीषाने लुटणारे आरोपी अटकेत

रायगड: इच्छापूर्ती नागमणी असल्याचे भासवून नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर दोन जण फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सुशांत नामदेव मोरे (33), मरकाम कालीदास राजपूत (35) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावं आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात आली.

महाड तालुक्यातील टोळ फाटा येथे इच्छापूर्ती नागमणी असल्याचा दावा करुन, ही टोळी अनेकांना लुबाडत होती. नागमणीचे आमीष दाखवून आपल्या जाळ्यात खेचत होती.

मात्र नागमणीचे प्रात्याक्षिक दाखवत असताना, पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली. यातील दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *