जगातील सर्वात लहान उंचीच्या मुलीचं मोठं मत

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदाना दरम्यान जगातील सर्वात लहान उंचीच्या मुलीने मतदान केलं आहे. नागपूर येथील मतदान केंद्रामध्ये गुरुवारी (4 एप्रिल) सर्वात लहान उंची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलीने मतदान केलं. ज्योती आमगे असं या मुलीचं नाव आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ज्योतीच्या उंचीची नोंद आहे. जगातील सर्वात कमी उंची असण्याचा विक्रम ज्योतीच्या …

जगातील सर्वात लहान उंचीच्या मुलीचं मोठं मत

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदाना दरम्यान जगातील सर्वात लहान उंचीच्या मुलीने मतदान केलं आहे. नागपूर येथील मतदान केंद्रामध्ये गुरुवारी (4 एप्रिल) सर्वात लहान उंची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलीने मतदान केलं. ज्योती आमगे असं या मुलीचं नाव आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ज्योतीच्या उंचीची नोंद आहे. जगातील सर्वात कमी उंची असण्याचा विक्रम ज्योतीच्या नवावर आहे. ज्योतीची उंची 63 सेंटीमीटर आहे.

जेव्हा ज्योती मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेली तेव्हा सर्व लोक तिला एकटक बघत होते. लाल आणि चेक्स स्लीव्हलेस ड्रेस यावेळी ज्योतीने घातला होता. दोन फूट एक इंच उंची असलेली ज्योती मतदान करण्यासाठी रांगते उभी होती. मतदान झाल्यानंतर शाई लागलेलं बोट दाखवत तिने इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. “पहिले मतदान करा आणि नंतर आपली कामं करा”, असंही ज्योती म्हणाली.


ज्योतीने मतदान केंद्र क्रमांक 253 वर मतदान केलं. ज्योतीने सेलिब्रिटी कुक आणि बिग बॉस 6 या कार्यक्रमातून दिसली होती. याशिवाय ज्योतीने अमेरिकेच्या आणि इटलीच्या टीव्ही कार्यक्रमातही अभिनय केला आहे.

लोणावळ्याच्या सेलेब्रिटी वॅक्स म्युझियमध्ये ज्योतीचा पुतळाही बसवण्यात आला आहे. ज्योती राहते त्या मतदारसंघातून भाजपकडून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून नाना पटोले निवडणूक रिंगणात आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *