लाडक्या भावाच्या अपघाती निधनाचा धक्का, मोठ्या भावाचाही मृत्यू

अहमदनगर : छोट्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकताच मोठ्या भावाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली या गावची ही घटना आहे. नगरमध्ये शिक्षण घेत असलेल्या भावाच्या अपघाती निधनाची बातमी समजताच, मोठ्या भावाला हा धक्का सहन झाला नाही आणि त्यानेही प्राण सोडले. सचिन चावरे (वय 21 वर्षे ) आणि शुभम […]

लाडक्या भावाच्या अपघाती निधनाचा धक्का, मोठ्या भावाचाही मृत्यू
नालासोपाऱ्यात भरधाव डंपरने दोघांना उडवले; अपघातात तरुणांचा जागीच मृत्यू
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 9:40 PM

अहमदनगर : छोट्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकताच मोठ्या भावाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली या गावची ही घटना आहे. नगरमध्ये शिक्षण घेत असलेल्या भावाच्या अपघाती निधनाची बातमी समजताच, मोठ्या भावाला हा धक्का सहन झाला नाही आणि त्यानेही प्राण सोडले. सचिन चावरे (वय 21 वर्षे ) आणि शुभम चावरे (वय 19 वर्षे ) असं या दोन सख्ख्या भावांचं नाव आहे. नजीक चिंचोली येथील शेतकरी पोपट सीताराम चावरे (वय 50 वर्षे) यांचा लहान मुलगा शुभम हा नगर येथे एमबीएचे शिक्षण घेत होता. मंगळवारी सकाळी 5 वाजता कॉलेजमध्ये गेला असता पायऱ्या चढताना तो पाठीमागे पडला. त्याला तातडीने नगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. पण उपचाराआधीच त्याला मृत घोषित करण्यात आलं. शुभमच्या मृत्यूची बातमी नजीक चिंचोली येथे घरी असलेल्या शुभमचा मोठा भाऊ सचिन याला समजली. शुभमच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सचिनची प्रकृती बिघडल्याने त्याला दुपारी 2 वाजता प्रथम भेंडा आणि त्यांनतर नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं. पण सचिनचेही उपचारापूर्वीच निधन झाले. नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शुभमचे शवविच्छेदन, तर नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात सचिनचे शवविच्छेदन केल्यानंतर दोघा भावांचे मृतदेह नजीक चिंचोली येथे आणण्यात आले. सायंकाळी 6 वाजता अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील आणि दोन्ही सख्ख्या भावांचं ही निधन होणं ही हृदयद्रावक घटना आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. शेतकरी पोपट सीताराम चावरे यांनी काही तासात आपली दोन तरुण मुलं गमावली. या मुलांच्या पश्चात आई-वडील आणि दोन बहिणी असा हा परिवार होता.

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.