पुणे – सातारा हायवेवर ST बस सुसाट असतानाच ड्राव्हरला हार्ट ॲटक आला आणि…. शेवटी तो गेला पण 25 प्रवाशांचे प्राण वाचवले

राज्य परिवहन महामंडळाची पालघर विभागाच्या वसई आगाराची एसटी बस, म्हसवडकडे प्रवाशांना घेऊन जातं होती. पुणे - सातारा महामार्गावरील वरवे, नसरापूर गावाच्या हद्दीत बस आल्यानंतर, मुळचे सातारा जिल्ह्यातील, खटाव तालुक्यातील पळशी गावच्या 45 वर्षाच्या जालिंदर रंगाराव पवार या बसचालकाला चक्कर येऊ लागली. वेळीच प्रसंगावधान दाखवून चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली. त्यामुळं बसमधील 25 प्रवाशांचे प्राण वाचलेत.

पुणे - सातारा हायवेवर ST बस सुसाट असतानाच ड्राव्हरला हार्ट ॲटक आला आणि.... शेवटी तो गेला पण 25 प्रवाशांचे प्राण वाचवले
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 6:34 PM

पुणे : पुणे – सातारा हायवेवर(Pune-Satara highway) एक थरारक घटना घडली आहे. स्वत:चा जीव धोक्यात असताना एका एसटी ड्रायव्हरने प्रसंगावधानता दाखवल्यामुळे 25 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. पुणे – सातारा हायवेवर ST बस सुसाट असतानाच ड्राव्हरला हार्ट ॲटक आला(driver suffered a heart attack). मात्र, त्याने बस बाजूला घेतली यामुळे मोठी दुर्घटना टळलेय आणि यामुळे बस मधील प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. बस थांबवल्यानंतर काही वेळातच ड्रायव्हरचा मृत्यू झाला. मृत्यू पूर्वी चालकाने दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

सातारा हायवेवर एसटी बस चालकाचा, हृदय विकाराचा तीव्र झटका आल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यूपूर्वी चक्कर आल्याचे जाणवल्यानं बसचालकाने, प्रसंगावधान दाखवत बस वेळीच रस्त्याच्या बाजूला घेतल्यानं, 25 प्रवाशांचे प्राण वाचलेत. जालिंदर पवार असं 45 वर्षीय मृत्यू झालेल्या बस चालकाचं नावयं. पुणे – सातारा महामार्गावरील नसरापूर गावाजळ ही घटना घडलीय. बस चालकाच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जातीय.

पालघर विभागाच्या वसई आगाराची एसटी बस साताऱ्याला निघाली होती

राज्य परिवहन महामंडळाची पालघर विभागाच्या वसई आगाराची एसटी बस, म्हसवडकडे प्रवाशांना घेऊन जातं होती. पुणे – सातारा महामार्गावरील वरवे, नसरापूर गावाच्या हद्दीत बस आल्यानंतर, मुळचे सातारा जिल्ह्यातील, खटाव तालुक्यातील पळशी गावच्या 45 वर्षाच्या जालिंदर रंगाराव पवार या बसचालकाला चक्कर येऊ लागली. वेळीच प्रसंगावधान दाखवून चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली. त्यामुळं बसमधील 25 प्रवाशांचे प्राण वाचलेत.

मृत ड्रायव्हर पुण्यात बदली ड्रायव्हर म्हणून आले

याप्रकरणी बसचे वाहक संतोष गवळी यांनी नसरापूरच्या राजगड पोलीस ठाण्यात माहिती दिली. बुधवारी वसई वरून आलेली एस बस दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकात पोहचली. यावेळी बस चालक संतोष कांबळे यांना बदली चालक म्हणून जालिंदर पवार आले.

खेड शिवापूरचा टोलनाका ओलांडल्या नंतर ड्रायव्हरला चक्कर आली

खेड शिवापूरचा टोलनाका ओलांडल्या नंतर बसचा वेग मंदावला, त्यावेळेस वाहकाने चालकाला विचारणा केली, तेंव्हा चक्कर येतं असल्याचं सांगत चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली. वाहकाने पवार यांना पुन्हा आवाज दिला, मात्र चालकानी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर वाहकाने प्रवाशांच्या मदतीने पवार यांना नसरापूर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. मात्र उपचारासापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले. बस चालकाच्या जाण्याने सहकारी st कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.