नाशिकमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाच घरातील चौघांचा होरपळून मृत्यू

नाशिक : नाशिक येथील दिंडोरी तालुक्यातील धाऊर गावात गॅस सिलेंडरच्या गळतीने स्फोट झाला. या स्फोटात चार चणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन मुलांसह पती आणि पत्नीचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा व्यक्त केली जात आहे. मुरलीधर हरी चौधरी (32), कविता मुरलीधर चौधरी(30), तुषार मुरलीधर चौधरी (10) आणि नयन कैलास चौधरी (8) अशी मृत …

नाशिकमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाच घरातील चौघांचा होरपळून मृत्यू

नाशिक : नाशिक येथील दिंडोरी तालुक्यातील धाऊर गावात गॅस सिलेंडरच्या गळतीने स्फोट झाला. या स्फोटात चार चणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन मुलांसह पती आणि पत्नीचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा व्यक्त केली जात आहे.

मुरलीधर हरी चौधरी (32), कविता मुरलीधर चौधरी(30), तुषार मुरलीधर चौधरी (10) आणि नयन कैलास चौधरी (8) अशी मृत झालेल्यांची नावं आहेत. या झालेल्या घटनेचा अधिक तपास दिंडोरी पोलीस करत आहेत.

चौधरी कुटुंब मंगळवारी रात्री जेवून झोपल्यानंतर ही घटना घडली. रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घरात लाईट नसल्यामुळे चौधरी कुटुंब दिवा लाऊन झोपले होते. मात्र यावेळी दिव्याची आग बारदानाला लागली आणि ही आगा सिलेंडरजवळ पोहचली. सिलेंडरचा रेग्युलेटर सुरु असल्याने स्फोट झाला आणि यामध्ये चौघांना प्राण गमवावे लागले आहेत.

याआधीही अनेक गॅस सिलेंडरच्या घटना घडल्या आहेत. गॅस सिलेंडरचा वापर करताना त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *