राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव, बुलडाण्यात बरा होऊन आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील एकाला बाधा

राज्यात एकिकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन विषाणूग्रस्तांची संख्याही वाढत आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याचे समोर आले.

राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव, बुलडाण्यात बरा होऊन आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील एकाला बाधा
प्रातिनिधिक छायाचित्र
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Dec 29, 2021 | 6:04 PM

कोल्हापूर जिल्ह्यात आज कोरोना बाधित रुग्णाला ओमिक्रॉनची बाधा (Omicron Patient) झाल्याचे उघडकीस आले आहे. ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण कोल्हापुरात (Kolhapur Omicron) सापडल्याने शहरात खळबळ माजली आहे. कोल्हापूर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोल्हापूरमधील चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या कुटुंबातील चार व्यक्तींना कोरोना झाल्याने उपचारासाठी दोघांना दाखल करण्यात आले होते. चार पैकी तिघांचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. आता या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची शोधाशोध सुरु झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाला बाधा

दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यातही काही दिवसांपूर्वी ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला होता. मात्र या रुग्णावर उपचार झाल्यानंतर बरा होऊन घरी परतलेल्या ओमीक्रोन ग्रस्तांच्या संपर्कातील एक जण ओमीक्रोन पोजीटिव्ह आढळला आहे. तर दोघांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. बुलडाण्यात जो पहिला ओमिक्रॉन ग्रस्त व्यक्ती आढळला होता, तो दुबईवरून आला होता. ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र आपाचारानंतर घरी गेल्यानंतर त्याच्या संपर्कातील तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढलले. त्यापैकी एकाचा अहवाल आज ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळला. या तिघांचीही प्रकृती चांगली असून आणखी दोघांचे अहवाल येणे बाकी आहे.

ओमिक्रॉनच्या धर्तीवर राज्यात निर्बंध

दरम्यान, ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळेच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. थर्टी फर्स्ट आणि न्यू इयरच्या पार्टी, सेलिब्रेशनवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच विविध रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये 50 टक्के उपस्थितीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त नागरिक असतील त्या हॉटेल्सवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच राज्यात सर्वत्र नाईट कर्फ्यूदेखील लागू करण्यात आला आहे.

इतर बातम्या-

Narayan Rane | जिच्यामुळे सिंधुदुर्गात राडा सुरु आहे, त्या जिल्हा बँकेला इतकं महत्त्वं का आलं? वाचा सविस्तर

नारायण राणेंविरोधात तक्रार देणारे ते दोघे कोण? आक्षेप काय? वाचा सविस्तर


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें