काँग्रेसमध्ये पहिलं बंड, औरंगाबादेत आमदार अब्दुल सत्तार अपक्ष लढणार

औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर होत आहेत, तसतसे बंडखोर उमेदवारांची नावे समोर येत आहेत. काँग्रेसमध्ये सर्वात मोठं बंड औरंगाबादमध्ये उभं राहिलं आहे. आमदार सुभाष झांबड यांच्या उमेदवारीला थेट विरोध करत काँग्रेसचे बडे नेते आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट लोकसभेत उडी घेतली आहे. अब्दुल सत्तार यांनी लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस उमेदवार आमदददार […]

काँग्रेसमध्ये पहिलं बंड, औरंगाबादेत आमदार अब्दुल सत्तार अपक्ष लढणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर होत आहेत, तसतसे बंडखोर उमेदवारांची नावे समोर येत आहेत. काँग्रेसमध्ये सर्वात मोठं बंड औरंगाबादमध्ये उभं राहिलं आहे. आमदार सुभाष झांबड यांच्या उमेदवारीला थेट विरोध करत काँग्रेसचे बडे नेते आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट लोकसभेत उडी घेतली आहे. अब्दुल सत्तार यांनी लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेस उमेदवार आमदददार सुभाष झांबड यांच्याविरोधात काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार निवडणूक लढवणार आहेत.

सुभाष झांबड यांच्या उमेदवरीबाबत विश्वासात घेतलं नसल्याचा दावा, काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. आमदार अब्दुल सत्तार हे औरंगाबाद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. काँग्रेसचे औरंगाबादचे उमेदवार सुभाष झांबड आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यात वाद सुरू होता. झांबड यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा दावा सत्तार यांनी केला आहे. त्यानंतर आता दोघांमधील वाद शिगेला पोहोचला आहे.

सुभाष झांबड यांचं सत्तारांना उत्तर

पक्षाने मला उमेदवारी दिली ती काही मी तुरर्मखान आहे म्हणून नाही, तर सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे म्हणून मला उमेदवारी दिली आहे, असा टोला विधानपरिषदेचे विद्यमान सुभाष झांबड यांनी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांना लगावला. आमदार सुभाष झांबड यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी, ही उमेदवारी देताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा दावा केला होता. त्याला झांबड यांनी हे उत्तर दिलं.

राष्ट्रवादीची नाराजी

दरम्यान काँग्रेसच्या उमेदवरीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार सतिश चव्हाण यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने तिसऱ्या यादीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होती. राष्ट्रवादीकडून सतिश चव्हाण हे उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते, मात्र काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिला.

संबंधित बातम्या 

औरंगाबादेत काँग्रेसचा उमेदवार, राष्ट्रवादीच्या सतिश चव्हाणांची जाहीर नाराजी

औरंगाबाद लोकसभा : पाचव्या टर्मसाठी खैरेंवर मतविभाजनाची टांगती तलवार

काँग्रेसची उमेदवार यादी, औरंगाबादमध्ये सुभाष झांबड, चंद्रपुरात मुत्तेमवारांना धक्का  

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.