ऑनलाईन फूड कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजच्या आरोग्य तपासणीचे आदेश

नागपूर : घरपोच अन्न सेवा पुरवणाऱ्या डिलिव्हरी बॉईजची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत. नागपुरात सध्या तीन कंपन्या घरपोच अन्न सेवा पुरवण्यात अग्रेसर आहेत. झोमॅटो, स्वीगी आणि उबर इट्स या कंपन्या नागपुरात प्रामुख्याने घरपोच अन्न पुरवतात. या फूड कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजची आरोग्य तपासणी करुन अहवाल पाठवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. […]

ऑनलाईन फूड कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजच्या आरोग्य तपासणीचे आदेश
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

नागपूर : घरपोच अन्न सेवा पुरवणाऱ्या डिलिव्हरी बॉईजची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत. नागपुरात सध्या तीन कंपन्या घरपोच अन्न सेवा पुरवण्यात अग्रेसर आहेत. झोमॅटो, स्वीगी आणि उबर इट्स या कंपन्या नागपुरात प्रामुख्याने घरपोच अन्न पुरवतात. या फूड कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजची आरोग्य तपासणी करुन अहवाल पाठवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.

या कंपन्या घरपोच अन्न पुरवत असल्याने ते लोकांसाठी अधिक सोयिस्कर झालं आहे. धावपळीच्या जीवनात घरी स्वयंपाकाला वेळ मिळत नसल्याने अनेकजण ऑनलाईन जेवण मागवतात. कंपन्यांच्या माध्यमातून आपण हवं ते घरबसल्या मागवू शकतो. पण, आपण जे अन्न मागवतो, त्या अन्नाचा दर्जा अत्यंत महत्त्वाचा असतो. अलिकडे अशाप्रकारे ऑनलाईन मागवलेलं अन्न हे कधी कधी निकृष्ट दर्जाचं असतं, हे सिद्ध करणारी अनेक प्रकरणं समोर आली. त्यानंतर या कंपन्यांनी अन्नाच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.

ऑनलाईन मागवलेलं अन्न हॉटेल ते आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम डिलिव्हरी बॉय करतात. त्यामुळे अन्नाच्या दर्जात कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाने या कंपन्यांना आता त्यांच्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्या संदर्भातील संपूर्ण अहवाल सादर करण्यासही सांगितले आहे.

ऑनलाईन जेवण मागवत असताना आपल्याला अनेक चिंता असतात. अन्न पोहोचवणारा डिलिव्हरी बॉय कशाप्रकारे त्याला हाताळत असेल? याची काळजी आपल्याला लागलेली असते. मात्र, आता अन्न व औषध प्रशासनाच्या या निर्णयामुळे तुमची चिंता दूर होणार आहे.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.