मला धमक्यांचे फोन, सरकारने पोलिस संरक्षण द्यावे, रेणू शर्माच्या वकिलांची मागणी

माझ्या जीवाला धोका असल्याचं सांगत मला सरकारने पोलिस संरक्षण द्यावं, अशी मागणी रेणू शर्मा यांच्या वकिल रमेश त्रिपाठी यांनी केलीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:56 PM, 15 Jan 2021
मला धमक्यांचे फोन, सरकारने पोलिस संरक्षण द्यावे, रेणू शर्माच्या वकिलांची मागणी

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप करुन खळबळ उडवून देणाऱ्या गायिका रेणू शर्मा यांच्यावतीने वकिल रमेश त्रिपाठी बाजू मांडत आहेत. आज त्यांनी माध्यमांसमोर येत माझ्या जीवाला धोका असल्याचं सांगत मला सरकारने पोलिस संरक्षण द्यावं, अशी मागणी केलीय. (The government should provide police protection, demanded Renu Sharma lawyers)

तक्रारदार रेणू शर्मा यांनी केस दाखल करु नये, यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून दबाव टाकला जात आहे. माझी ताकद तुम्हाला माहिती नाही. जर तक्रार दाखल केली तर शर्मा कुटुंबीयांना खंडणीच्या गुन्ह्यात जेलमध्ये टाकीन, अशी धमकी मुंडे यांनी दिल्याचा आरोप वकिल रमेश त्रिपाठी यांनी केला आहे.

गायिका रेणू शर्मा यांची बाजू मांडत असताना अनेक लोकांचे धमक्यांचे फोन येत आहेत. त्यामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण झाला असून मला पोलीस संरक्षण देण्यात यावेत, अशी मागणी मी गृहमंत्र्यांकडे केली आहे, असं त्रिपाठी यांनी सांगितलं.

धनंजय मुंडे प्रकरणी आमच्याकडे पुरावे आहेत. हे पुरावे आम्ही पोलिसांकडे देऊ. या प्रकरणात पोलीस उद्या एफआयआर दाखल करतील अशी आशा आहे. पोलीसांनी एफआयआर दाखल नाही केला तर आम्ही कोर्टात जाऊ, असा इशारा त्रिपाठी यांनी दिलाय.

रेणू यांच्यावरील बलात्काराचा व्हिडीओ काढण्यात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी तिला वेळोवेळी देण्यात आली. त्यामुळे तिने अद्यापपर्यंत केस दाखल केली नव्हती. मात्र, आता काही होणार नसल्याचं वाटल्यानेच रेणू यांनी पोलिसात जाण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. करुणा शर्मा आणि रेणू शर्मा या दोन वेगवेगळ्या केसेस आहेत. रेणू आणि करुणा या सख्या बहिणी आहेत. याचा अर्थ एकीशी लग्न झाल्याने दुसरीवर बलात्कार करण्याचा अधिकार मिळत नाही, असंही ते म्हणाले.

ठळक बातम्या, बेधडक विश्लेषण, पाहा 8 PM स्पेशल रिपोर्ट, टीव्ही 9 मराठीवर

प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न

इतर काही नेत्यांनी रेणूवर आरोप केले आहेत. केवळ रेणूची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि या प्रकरणावरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठीच हा प्रकार केला जात आहे. मुंडेंविरोधातील केस कमकूवत करण्याचा हा प्रकार आहे. आरोप करणाऱ्या कोणत्याही व्यक्तिकडून आम्हाला नोटीस आलेली नाही. नोटीस आली तर त्याला उत्तर देऊ, असं ते म्हणाले. रेणूने कुणालाही हनी ट्रॅप केलं नाही. हनी ट्रॅपही झालेलं नाही. रिझवान शेख हा तर बेरोजगार होता मग हनी ट्रॅपचा प्रश्न येतोच कुठे? असा सवालही त्यांनी केला आहे.

(The government should provide police protection, demanded Renu Sharma lawyers)

हे ही वाचा

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, शरद पवारांची आजही रोखठोक भूमिका

Dhananjay Munde Case : म्हणून धनंजय मुंडेंवरील आरोप ‘गंभीर’ असल्याचं म्हणालो, शरद पवारांचं स्पष्टीकरण

ज्या मुद्द्यावरून वाद आहेत त्यापासून दूर राहणं हेच शहाणपणाचं; राम मंदिर मुद्द्यावरुन पवारांचा राज्यपालांना टोला