Gram Panchayat Election : MIM चा डोळा असलेली महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत!

ग्राम पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गावाखेड्यात आणि प्रत्येक पारावर गावपुढाऱ्यांची गणितांची जुळवाजुळव सुरु झाली आहे.

Gram Panchayat Election : MIM चा डोळा असलेली महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत!
FILE PHOTO : असदुद्दीन ओवेसी
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:10 PM

नांदेड : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम (Gram Panchayat Election ) सुरु आहे. कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे रखडलेल्या जवळपास 14 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे (Gram Panchayat election voting). त्यासाठी 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाने (election commission) ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी किमान सातवी पासची अट घातली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गावाखेड्यात आणि प्रत्येक पारावर गावपुढाऱ्यांची गणितांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. (Nanded Wajegaon Gram Panchayat election MIM)

अशा परिस्थितीत तिकडे नांदेडमधील एक ग्रामपंचायत सर्वाधिक चर्चेत आहे. नांदेड शहराजवळ असलेल्या वाजेगावात ग्रामपंचायत निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी या गावची ओळख आहे. मात्र यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत एमआयएम पक्ष आपले पॅनल उभे करणार आहे.

मुस्लिम बहुल असलेल्या या गावात एमआयएमच्या प्रवेशामुळे रंगत आली आहे. साडे आठ हजार मतदार असलेल्या वाजेगावात 17 सदस्य निवडून द्यायचे आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम अशी ओळख या गावाची असल्याने इथली सत्ता मिळवण्यासाठी निकराची लढाई होणार हे स्पष्ट आहे.

वाजेगावावर कुणाचं वर्चस्व?

वाजेगाव हे नांदेडमधील मोठं गाव आहे. लोकसभा असो की विधानसभा निवडणूक, या गावच्या मतदानावर बरंच काही अवलंबून असतं. गावात तब्बल साडेआठ हजार मतदार आहे. गावची लोकसंख्या दहा हजारांच्या पुढे. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीत या गावातील मतदान निर्णायक ठरतं. निकाल फिरवण्याची ताकद या एकट्या गावात आहे. त्यामुळेच राजकीयदृष्ट्या हे गाव अत्यंत महत्त्वाचं आहे.

आजपर्यंत या गावावर काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळालं. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड जिल्ह्यात दबदबा आहे. पूर्वीपासून नांदेड आणि काँग्रेस हे समीकरण आहे. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून नांदेडचं समीकरणच बदललं आहे. नांदेडमध्ये MIM ने मुसंडी मारली आहे. महापालिका, पंचायत समित्यांमध्ये MIM चा दबदबा पाहायला मिळाला. यानंतर लोकसभा निवडणुकीत भाजपने वर्चस्व गाजवलं आणि इथे प्रताप पाटील चिखलीकर यांनी विजय मिळवला.

MIM च्या एण्ट्रीमुळे नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत

एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे आपले उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे करणार आहे. ज्या गावात आपली ताकत आहे , तिथे हे दोन्ही पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला आता भाजपसह या दोन्ही पक्षांचे आव्हान मिळणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील 1014 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सध्या लगबग सुरु आहे. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात काँग्रेस, शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे प्राबल्य आहे. मात्र या चारही पारंपारिक राजकीय पक्षांना आता ग्रामपंचायत निवडणुकीत देखील एमआयएम आणि वंचित आघाडीने आव्हान दिलं आहे. बहुतेक वेळा काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्यात एमआयएम आणि वंचित आघाडीचा मोठा वाटा असतो, हे आजवरच्या निवडणुकीतून स्पष्ट झालंय. आता ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील अशीच मतविभाजनी झाली तर त्याचा काँग्रेसला मोठा फटका बसण्याची भीती राजकीय निरीक्षक व्यक्त करतायत.

वाजेगावमध्ये एमआयएमची एण्ट्री

नांदेड शहरालगत असलेली मोठी ग्रामपंचायत म्हणून वाजेगावची ओळख आहे. या ग्रामपंचायतीत काँग्रेसची मोठी दमछाक होणार आहे असे चित्र आहे. कारण यंदा एमआयएमच्या आधीपत्याखाली एक पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. पूर्वी ही ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात होती. आता या गावात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदायाचे लोक राहतात. मुस्लिम समुदाय हा एमआयएम आण काँग्रेसचा मतदार आहे. यामुळे यंदा कॉंग्रेसला मत विभाजनाची भीती आहे.

या गावाची लोकसंख्या 12 हजार असून मतदार 8 हजार 500 आहे. गावात एकूण 17 सदस्यांची ग्रामपंचायत आहे. वाजेगावात स्थानिक पातळीवर कॉंग्रेसमध्ये दोन गट पडलेत. त्याचा फायदा एमआयएमला नक्कीच होणार असे सांगतायत. एमआयएमचे पॅनल प्रमुख शेख मूखिद यांनी आपल्याला यश मिळणार असल्याचा दावा केलाय. तर काँग्रेसचे पॅनल प्रमुख शेख जमील असून त्यांच्यावर एक गट नाराज आहे. महापालिकेच्या निवडणुकीतून ज्या जुन्या नांदेड शहराच्या माध्यमातून एमआयएमने महाराष्ट्रात प्रवेश केला, त्याच भागातून पुन्हा एमआयएम ग्रामपंचायत मार्फत नशीब अजमावत आहे.

वंचित आघाडी महाविकास आघाडी बिघडवणार?

नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी ग्रामपंचायत निवडणुकीच्या जय्यत तयारीला लागली आहे. जिथं शक्य आहे तिथे वंचित आघाडीचे पॅनल निवडणुकीत असेल. तर जिथे शक्य झालं नाही तिथं स्वतंत्रपणे आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध करताना वंचित आघाडी निर्णायक स्थितीत राहील असा विश्वास जिल्हा अध्यक्ष शिवा नरंगले यांनी व्यक्त केला आहे. वंचित आघाडीचे नेते श्याम कांबळे सध्या गावोगावी जाऊन ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करत आहेत. एकूणच, एमआयएम पाठोपाठ वंचित आघाडी नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत आणणार असे चित्र सध्या तरी आहे.

(Nanded Wajegaon Gram Panchayat election MIM)

संबंधित बातम्या 

नवा जीआर जारी, ग्राम पंचायत सदस्य होण्यासाठी ‘ही’ अट लागू  

ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलं, अर्ज भरण्यास सुरुवात, यंदा महत्त्वाचे दोन बदल कोणते? 

ग्रामपंचायत निवडणूक लढवायची आहे? मग तुम्हाला ‘या’ अर्जाची पोचपावती गरजेची

तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.