देशाचा मध्य असलेल्या नागपुरातील शून्य मैल दगडाची गोष्ट

1907 मधील हा दगड नागपूरचे भौगोलीक स्थान ठळक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या शून्य मैलाच्या शेजारीच असेलेला जी. टी. एस. दगड (GTS Stone Nagpur) हा तत्कालीन विशाल त्रिकोणमितीय सर्वेक्षणाचा एक साक्षीदार म्हणून आजही उभा आहे.

देशाचा मध्य असलेल्या नागपुरातील शून्य मैल दगडाची गोष्ट
Follow us
| Updated on: Dec 17, 2019 | 11:36 PM

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी, संत्र्यांचे शहर अशी विविध वैशिष्ट्ये सांगणाऱ्या नागपूर (Nagpur City) शहराची ओळख ठळक केली जाते ती शून्य मैलाच्या दगडाने अर्थातच झिरो माईल्स स्टोनमुळे (Zero Mile Stone Nagpur). 1907 मधील हा दगड नागपूरचे भौगोलीक स्थान ठळक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या शून्य मैलाच्या शेजारीच असेलेला जी. टी. एस. दगड (GTS Stone Nagpur) हा तत्कालीन विशाल त्रिकोणमितीय सर्वेक्षणाचा एक साक्षीदार म्हणून आजही उभा आहे. ब्रिटिशकालीन सर्वेक्षणावेळी संपूर्ण देशभरात असे साधारणत: 80 शून्य मैलाचे दगड उभारले गेले असले, तरी देशाचा मध्य म्हणून नागपूरच्या शून्य मैलाच्या दगडाचे वैशिष्ट्ये महत्त्वाचे आहे.

देश चालविण्यासाठी महसूल गोळा करणे आवश्यक असते. त्यामुळे महसूल गोळा करण्यास सुविधा निर्माण व्हावी यासाठी आणि स्थल व उंच-सखलपणा दाखवणारे नकाशे अचूक सर्व्हेक्षण करून बनवण्याच्या मुख्य उद्देशाने जी.टी.एस. हा प्रकल्प (GTS Stone Nagpur) राबविण्यास 19 व्या शतकाच्या प्रारंभीच झाली. कालांतराने इस्ट इंडिया कंपनी आणि नंतर ब्रिटीश राजवटीत ते सर्वेक्षण पूर्ण झाले. सध्या नागपूरात झिरो माईल्सच्या शेजारी असलेल्या जी.टी. एस. या दगडावरही त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची फुटामध्ये 1020.171 अशी कोरण्यात आली आहे. आपल्या साम्राज्याच्या सीमा निश्चित करणे आणि त्यातून आपले राज्य बळकट करणे हा जरी ब्रिटिशांचा या सर्वैक्षणामागे उद्देश असला तरी त्याचे ऐतिहासिक महत्त्व कमी होत नाही. या सर्वैक्षणाच्या माध्यमातूनच त्यांनी एव्हरेस्ट, कांचनगंगा, के.टू यांसारख्या शिखरांची उंची निश्चित केली होती.

नागपूरमध्ये असलेल्या शून्य मैलाच्या दगडाच्या माध्यमातूनही त्याच्या चहोबाजुला असलेल्या कवठा, हैदराबाद, चंदा, राजपूर, जबलपूर, सीओनी, छिंदवाडा, बैतुल शहरांची अंतरे दर्शविली आहेत. सध्या हा दगड आपला ऐतिहासिक खुणा घेऊन उभा आहे. या ठिकाणी असलेली चार घोड्यांचे शिल्प या स्मारकाच्या सौंदर्यात भर घालते.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.