मोठी बातमी! पश्चिम घाटातील साताऱ्यापासून सिंधुदुर्गापर्यंत व्याघ्रक्षेत्र घोषित होणार

या भागात पट्टेरी वाघ असल्याची माहिती वनविभागाला मिळालीय, तसेच त्याच्या काही खुणाही आढळून आल्यात. या भागातील 67.82 चौरस किमीचे क्षेत्रफळ राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

मोठी बातमी! पश्चिम घाटातील साताऱ्यापासून सिंधुदुर्गापर्यंत व्याघ्रक्षेत्र घोषित होणार

ठाणेः पश्चिम घाटातील सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या जांभळीपाड्यापासून सिंधुदुर्गातील तिलारी खोऱ्यापर्यंतचे क्षेत्र व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात येणार आहे. या भागात पट्टेरी वाघ असल्याची माहिती वनविभागाला मिळालीय, तसेच त्याच्या काही खुणाही आढळून आल्यात. या भागातील 67.82 चौरस किमीचे क्षेत्रफळ राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

11 नवीन वन्यजीव संवर्धन राखीव क्षेत्रे जाहीर

आतापर्यंत महाराष्ट्रात 11 नवीन वन्यजीव संवर्धन राखीव क्षेत्रे जाहीर करण्यात आलीत. या क्षेत्रात पट्टेरी वाघ आणि अन्य वन्यजीव वनस्पतींच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, भुदरगड, गगनबावडा या भागात दोन संवर्धन क्षेत्रे राखीव ठेवण्यात आलीत.

सावंतवाडीतील तिलारी राखीव क्षेत्र 30 चौरस किमी

सावंतवाडीतील तिलारी राखीव क्षेत्र 30 चौरस किमी आहे, आंबोली-दोडामार्ग राखीव क्षेत्र 57 चौरस कमी आहे. तसेच सातारा वन विभागातील जांभळी वनक्षेत्र 65 चौरस किमीमध्ये पक्षी संवर्धन केंद्र उभारणार आहेत. या क्षेत्राचे पक्षी आणि वन्यजीव संवर्धन असे दोन भागात विभाजन केले जाणार आहे.

विदर्भ, नागपूर आणि अमरावतीत तीन क्षेत्रे नव्याने विकसित केली जाणार

विशाळगड येथे 93 चौरस किमी, पन्हाळगड येथे 73 चौरस किमी, चंदगड येथे 225 चौरस किमी ही कोकण पश्चिम महाराष्ट्रातील राखीव क्षेत्रे आहेत. विदर्भ, नागपूर आणि अमरावतीत तीन क्षेत्रे नव्याने विकसित केली जाणार आहेत. कोयना, चांदोली अभयारण्यासाठी राखीव जागा आणि राधानगरी, तिलारी जंगलाचा परिसर हा टायगर कॉरिडोर म्हणून ओळखला जातो.

इथला जंगल परिसर वाघांसाठी पोषक

कोयना, चांदोली, राधानगरी, तिलारी पुढे गोवा आणि कर्नाटकातील जंगल असा वाघांच्या संचाराचा मार्ग आहे. इथला जंगल परिसर वाघांसाठी पोषक असून, मानवी हस्तक्षेप या परिसरात कमी आहे. तसेच सिंधुदुर्ग, चंदगड या क्षेत्रामध्ये हत्तीचा अधिवास असल्यानं राधानगरी अभयारण्याच्या दक्षिण बाजूला हत्ती आणि व्याघ्र प्रजनन केंद्र तयार केली जाणार आहेत.

इतर बातम्या-

ST Strike| आंदोलन दडपणे सुरू, 40 कर्मचाऱ्यांना डांबले, हिंसक वळण लागेल; भाजप नेते दरेकरांचा सरकारला इशारा

12 तारखेची हिंसा डिलीट करून 13 तारखेच्या घटनेवर जोर का दिला जात आहे?, यशोमती ठाकूर गप्प का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

Published On - 6:18 pm, Fri, 26 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI