राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आठवड्याच्या चार दिवस राहणार कडकडीत लॉकडाऊन

मात्र वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने आता गुरुवार ते सोमवार चार दिवस कडकडीत लॉकडाऊन राहणार आहे.

  • जितेंद्र बैसाने, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार
  • Published On - 15:27 PM, 6 Apr 2021
राज्यातील 'या' जिल्ह्यात आठवड्याच्या चार दिवस राहणार कडकडीत लॉकडाऊन
सांकेतिक फोटो

नंदुरबार: जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला होता, मात्र वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने आता गुरुवार ते सोमवार चार दिवस कडकडीत लॉकडाऊन राहणार आहे. (There will be severe lockdown four days a week in Nandurbar district of the state)

चार दिवसांत वैद्यकीय सुविधा सोडून सर्व व्यवहार बंद राहणार

या चार दिवसांत वैद्यकीय सुविधा सोडून सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा उद्रेक आणि वाढती मृत्यू संख्या लक्षात घेत कोरोना साखळी ब्रेक करण्यासाठी आठवड्यातील चार दिवस जिल्ह्यात कडक लॉकडाऊन राहणार आहे. तर सोमवार ते बुधवार किराणा भाजीपाला इतर सुविधा सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना टेस्टची संख्या वाढविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली.

जिल्ह्यात दिवसभरात लसीकरण दोन ते अडीच हजारांपर्यंत

जिल्ह्यातील हॉटस्पॉट नंदुरबार शहर आणि तालुका शहादा शहर तालुक्यातील मसावदमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 37 टक्के असून, मृत्युदर 1.63 आहे. तसेच जिल्ह्यात दिवसभरात लसीकरण दोन ते अडीच हजारांपर्यंत होत आहे. आतापर्यंत एकूण 60,000 एवढे लसीकरण झालेय. शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयातील बेड शिल्लक नाहीत. रेमॅडेसिव्हीर इंजेक्शनच्या देखील तुटवडा आहे.

काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार?

नंदुरबार जिल्ह्यात सोमवार ते बुधवार सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत बाजार पेठ सुरु राहील
यात भाजीपाला, किरणा दुकाने, नाशवंत पदार्थांची दुकाने, शेती साहित्य विषयक दुकाने सुरू राहतील.
गुरुवार ते रविवार वैद्यकीय सेवा वगळून सर्व व्यवहार बंद राहतील

संबंधित बातम्या

There will be severe lockdown four days a week in Nandurbar district of the state