डॉक्टरांचं महिलेला जीवदान, चोरट्यांनी डोळ्यात खुपसलेला विळा बाहेर काढला

चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी एका वृद्ध महिलेच्या डोळ्यात विळा खुपसला. ही धक्कादायक घटना 22 जानेवारीला यवतमाळमधील पुसद गावात (Thieves attack on women) घडली.

Thieves attack on women, डॉक्टरांचं महिलेला जीवदान, चोरट्यांनी डोळ्यात खुपसलेला विळा बाहेर काढला

नागपूर : चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी एका वृद्ध महिलेच्या डोळ्यात विळा खुपसला. ही धक्कादायक घटना 22 जानेवारीला यवतमाळमधील पुसद गावात (Thieves attack on women) घडली. हा विळा महिलेच्या डोळ्यात मारल्यामुळे त्यांना गंभीर दुखापात झाली होती. यानंतर त्यांना तातडीने नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. येथे डॉक्टरांच्या पथकाने यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करत डोळ्यात खुपसलेला विळा बाहेर काढून मीराबाई यांना (Thieves attack on women) जीवदान दिले.

यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील आसोली गावात मीराबाई राहतात. 22 जानेवारीला चोरट्यांनी त्यांच्यावर शेतीकामात वापरणाऱ्या विळ्याने त्यांच्या डोळ्यावर वार केले. या हल्ल्यात विळा मिराबाईच्या उजव्या डोळ्यातून घुसून थेट डोक्याच्या आत मेंदूपर्यंत पोहचला होता. मिराबाईच्या कुटुंबीयांनी जखमी अवस्थेत त्यांना स्थानिक डॉक्टरांकडे नेले. परंतु डॉक्टरांनी मीराबाई यांना उपचारासाठी नागपूरात नेण्याचा सल्ला दिला.

जखमी मीराबाई यांना कुटुंबीयांनी पुसदवरून थेट नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटर मध्ये हलवले. यादरम्यान मीराबाई या बेशुद्धावस्थेत होत्या, घटनास्थळ ते मेडिकल पर्यंतच्या प्रवासात विळा मीराबाई यांच्या डोक्यात तसाच खुपसलेल्या अवस्थेत होता. मिराबाईंची अवस्था पाहून ट्रॉमा सेंटरमधील डॉक्टरांनी तातडीने हालचाली केल्या. तसेच अवघ्या दीड तासात सर्व तपासण्या पूर्ण करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.

डॉक्टरांच्या एका पथकाने शस्त्रक्रिया करून डोक्यात आतवर खोल रुतलेला विळा सुमारे एक तासाच्या शस्त्रक्रियेत बाहेर काढला. उजव्या डोळ्यातून विळा आता गेल्याने उजवा डोळा पूर्णपणे निकामी झाला आहे. फुटलेला डोळा बाहेर काढून चेहऱ्याचा तेवढा भाग शिवण्यात आला. सुदैवाने डाव्या डोळ्याची दृष्टी कायम आहे.

ही शस्त्रक्रिया अतिशय किचकट स्वरूपाची होती. या शस्त्रक्रियेमुळे मिराबाईच्या जीवाला धोका होता. विळा डोक्यात मेंदूपर्यंत आत शिरल्याने मेंदूलाही ईजा होण्याची शक्यता होती. विळा वक्राकार असल्याने डोक्याच्या इतर अवयवांना धोका होण्याची शक्यता होती. त्यामुळे विळा बाहेर काढताना मेंदूला कुठलीही इजा होणार नाही याची काळजी घेणे हे डॉक्टरांसमोर आव्हान होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन शासकीय मेडिकल रुग्णालयाच्या ट्रॉमा विभागाच्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया पूर्ण करून डोक्यातील विळा बाहेर काढला आणि मिराबाईंना नवजीवन दिले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *