सांगली लोकसभेसाठी आता तृतीयपंथी उमेदवार मैदानात

सांगली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करत आहेत. पण सांगली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणूक रिंगणात एक तृतीयपंथी उमेदवार मैदानात आहे. राष्ट्रविकास सेनेकडून मोना दिगंबर तुपलोंडेंना उमेदवारी देण्यात आली आहे. येत्या 28 तारखेला मोना तुपलोंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रत्येक पक्ष सक्षम उमेदवार शोधून त्याला उमेदवारी …

सांगली लोकसभेसाठी आता तृतीयपंथी उमेदवार मैदानात

सांगली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करत आहेत. पण सांगली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणूक रिंगणात एक तृतीयपंथी उमेदवार मैदानात आहे. राष्ट्रविकास सेनेकडून मोना दिगंबर तुपलोंडेंना उमेदवारी देण्यात आली आहे.

येत्या 28 तारखेला मोना तुपलोंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रत्येक पक्ष सक्षम उमेदवार शोधून त्याला उमेदवारी देत आहे. मात्र राष्ट्रविकास सेनेने समाजाविषयी काहीतरी चांगले काम करु इच्छिणाऱ्या सांगली जिल्ह्यातील एका तृतीयपंथीला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय.

मोना तुपलोंडे या शिक्षित उमेदवार आहेत. त्यांनी बीकॉम प्रथम वर्षापर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. सांगली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एक तृतीयपंथी उमेदवार निवडणूक लढवणार आहे. येत्या 28 तारखेला मोना तुपलोंडे या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सध्या घाणेरडं राजकारण सुरु असून घराणेशाही सुरु आहे. ही घराणेशाही मोडकळीस आणण्यासाठी माझी उमेदवारी असल्याची प्रतिक्रिया मोना यांनी दिली. माझ्यासारख्या बहुजनातील वंचिताला न्याय मिळवून देण्यासाठी माझी उमेदवारी आहे. बहुजनांना त्यांच्या न्याय हक्काची जाणीव करुण देण्यासाठी माझी उमेदवारी आहे. जे शेतकरी आत्महत्या करुन मरत आहेत, पण त्या शेतकऱ्यांच्या मागे भक्कमपणे कोणी उभे राहत नाही, शेतकऱ्यांना मदत कोणी करत नाही, त्यांची समस्या कोणी जाणून घेत नाही, त्या बळीराजाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी माझी उमेदवारी आहे, अशी प्रतिक्रिया मोना यांनी दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *