कोरोनाचा कहर; महाराष्ट्राच्या 60 जेलमधील हजारो कैदी सुटण्याची चिन्हे

जेलमधील एकाही कैद्याला कोरोनाची लागण झाली तर सर्वत्र हाहा:कार माजू शकतो (Prisoner will be release from jail). याच विचारातून सुप्रीम कोर्टाने जेल कैदींबाबत काही महत्वाचे आदेश दिले आहेत.

कोरोनाचा कहर; महाराष्ट्राच्या 60 जेलमधील हजारो कैदी सुटण्याची चिन्हे
Follow us
| Updated on: Mar 26, 2020 | 8:19 PM

मुंबई : जेलमधील एकाही कैद्याला कोरोनाची लागण झाली तर सर्वत्र हाहा:कार माजू शकतो (Prisoner will be release from jail). याच विचारातून सुप्रीम कोर्टाने जेल कैदींबाबत काही महत्वाचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार राज्याच्या जेलमधील सुमारे 10 ते 15 हजार कैद्यांची सुटका करावी, अशी मागणी मुंबई हाय कोर्टातील ज्येष्ठ वकील सुभाष तळेकर यांनी केली आहे (Prisoner will be release from jail).

राज्यात एकूण 60 जेल आहेत. या सर्व जेलची क्षमता केवळ 24 हजार आहे. मात्र, या सर्व जेलमध्ये 37 हजारपेक्षाही जास्त कैदी आहेत. सध्या करोना विषाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. जेलमध्ये कुणाला कोरोनाची लागण झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. हजारो कैदी आजारी पडतील.

अॅड. सुभाष तळेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना याबाबत निवेदनही पाठवले आहे. तळेकर यांची ही मागणी पूर्ण झाली तर राज्यातील हजारो कैद्यांची सूटका होऊ शकते. ही मागणी पूर्ण झाली तर या कैद्यांची जामिनावर सुटका होण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने 20 मार्च 2020 रोजी देशातील कैद्यांबाबत महत्वाचे आदेश दिले आहेत. राज्य पातळीवर एक समिती स्थापन करण्यात यावी. या समितीने आढावा घ्यावा आणि ज्या कैद्यांनी आर्धी शिक्षा भोगली आहे त्यांना सीआरपीसीच्या 436 ‘अ’ कायद्यानुसार जामिनावर सोडण्यात यावं, असं आदेशात म्हटलं आहे. ही कारवाई झाल्यास हजारो कैदी जामिनावर सुटू शकतात. त्यामुळे जेलमध्ये असलेल्या कैद्यांना कोरोनाचा धोका टळू शकतो, असं अॅड. सुभाष तळेकर म्हणाले.

दरम्यान, जगभरात थैमान घालणारा कोरोना भारतात फोफावत चालला आहे. या आजाराला नष्ट करण्यासाठी सरकार सर्वोत्तोपरी मेहनत घेत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सरकार कठोर निर्णय घेत आहे. देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, तरीही कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे.

संबंधित बातम्या :

Corona Death | मुंबई आणखी एका महिलेचा मृत्यू, कोरोनाबाधित मृतांची संख्या 5 वर

तळकोकणातही कोरोनाचा शिरकाव, सिंधुदुर्गमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.