ठाण्यात ओला चालकाला ‘जय श्री राम’ च्या घोषणा देण्याची जबरदस्ती

ठाण्यातील एका ओला चालकावर हल्ला करुन त्याला जय श्री रामच्या घोषणा देण्याची जबरदस्ती करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

ठाण्यात ओला चालकाला ‘जय श्री राम’ च्या घोषणा देण्याची जबरदस्ती

दिवा (ठाणे) : गेल्या काही दिवसांपासून देशभरात ‘जय श्री राम’ च्या घोषणा देण्याची सक्ती केल्याचे अनेक प्रकरण उघडकीस येत आहे. महिनाभरापूर्वी पुण्यातील एका डॉक्टरला राजधानी दिल्लीत ‘जय श्री राम’ घोषणा देण्यास जबरदस्ती केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर आता ठाण्यातील एका ओला चालकावर हल्ला करुन त्याला जय श्री रामच्या घोषणा देण्याची जबरदस्ती करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. मंगेश मुंढे (30), अनिल सूर्यवंशी (22) आणि जयदीप मुंढे (26) अशी या तिघांची नावे असून त्या तिघांना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

फैसल उस्मान खान (25) हे म्रुंबा येथे राहत असून ते ओला कंपनीची कार चालवतात. रविवारी (23 जून) पहाटे  दिव्यातील आगासन रोडवरुन भाडे घेतले.  गाडी चालवत असताना अचानक रस्त्यात त्यांची गाडी बंद पडली. त्यानंतर मागून येणाऱ्या दुचाकीवर बसलेल्या तिघांनी रस्त्यात गाडी का उभी केली अशी विचारणा केली. त्यासोबत त्याला शिवीगाळ आणि मारहाणही करण्यास सुरुवात केली.

या प्रकारामुळे गाडीत बसलेला प्रवाशी गाडीतून उतरुन निघून गेला. यानंतर फैसल यांनी ‘मला मारु नका सोडून द्या’ अशी विनंती या तीन आरोपींना केली. मात्र त्यांनी फैसलचे काहीही न ऐकता ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यास जबरदस्ती केली.

या सर्व प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी (24 जून) फैसलने मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याशिवाय खानने या दुचाकीचा नंबरही पोलिसांनी दिला. मुंब्रा पोलिसांनी त्या माहितीच्या आधारे तीन आरोपींना अटक केली. मंगेश मुंढे (३०), अनिल सूर्यवंशी (२२) आणि जयदीप मुंढे (२६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे तिघेही आरोपी दिव्यातच राहत असून, दारूच्या नशेत त्यांनी हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील डॉ अरुण गडरे यांनी दिल्लीत अज्ञात तरुणांनी ‘जय श्री राम’ अशा घोषणा देण्यास जबरदस्ती केल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. दिल्लीतील कनॉट प्लेस या ठिकाणच्या हनुमान मंदीर परिसरात ही घटना घडली होती. दरम्यान दिवसेंदिवस जय श्री राम अशा घोषणा देण्यास जबरदस्ती होत असल्याच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सरकार आणि पोलिस प्रशासनाने याबाबत कठोर पाऊलं उचलावी, अशी मागणी अनेकजण करत आहेत.

संबंधित बातम्या :

पुण्यातील डॉक्टरला दिल्लीत ‘जय श्री राम’ च्या घोषणा देण्याची जबरदस्ती

VIDEO : ‘जय श्री राम’च्या घोषणेमुळे ममता बॅनर्जी चिडल्या, गाडीतून उतरुन लोकांवर धावल्या

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *