धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिर उडवण्याची धमकी

धुळे : शहरातील देवपूर येथील स्वामी नारायण मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाला शनिवारी याबाबत 2 धमकी वजा निनावी पत्रे मिळाली. ही दोन्ही पत्रे हिंदीमध्ये लिहिलेली आहेत. या धमकीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंदिर प्रशासनाने जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना या प्रकाराची माहिती दिली आहे. शनिवारी सायंकाळी पोलीस प्रशासनाने मंदिर परिसरला भेट देऊन …

धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिर उडवण्याची धमकी

धुळे : शहरातील देवपूर येथील स्वामी नारायण मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाला शनिवारी याबाबत 2 धमकी वजा निनावी पत्रे मिळाली. ही दोन्ही पत्रे हिंदीमध्ये लिहिलेली आहेत. या धमकीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मंदिर प्रशासनाने जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना या प्रकाराची माहिती दिली आहे. शनिवारी सायंकाळी पोलीस प्रशासनाने मंदिर परिसरला भेट देऊन पाहणी केली. तसेच सुरक्षा यंत्रणांनाही सतर्क केले. सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंदिर परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांची तपासणी करुनच मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याचेही स्पष्ट केले. पोलीस प्रशासन या पत्राची सखोल चौकशी करत असून सत्य लवकरच समोर येईल, असेही सांगण्यात आले.

स्वामी नारायण मंदिर आकर्षक आणि सुबक असल्याने या मंदिरात धुळे शहरासह राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. नेहमीच येथे भाविकांची वर्दळ असते. त्यामुळे या धमकीने भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न तयार झाला आहे. मात्र, पोलिसांनीही याबाबत खबरदारी घेत तपास सुरु केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *