धान उत्पादकांना 700 रुपये ते सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालय; ठाकरे सरकारचे तीन महत्त्वाचे निर्णय

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल 700 रुपये देण्याच्या निर्णयाला मंगळवारी मंजुरी देण्यात आली. (important decision state ministry)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:56 PM, 24 Nov 2020
important decision state ministry

मुंबई : धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल 700 रुपये देण्याच्या निर्णय (Paddy Procurement Incentive Support) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (important decision state ministry) मंगळवारी घेण्यात आला. तसेच, येत्या शुक्रवारवासून (27 नोव्हेंबर) कापूस खरेदी केंद्रे सरु करणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे वैद्यकीय महाविद्यालय असे विविध प्रकारचे निर्णय मंगळवारी घेण्यात आले. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे सर्व निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या निर्णयांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 1400 कोटी रुपये इतका अतिरिक्त खर्च येईल. (Three important decision of Maharashtra Cabinet)

खरीप हंगाम 2020-21 साठी केंद्र शासनाने धानाची आधारभूत किंमत साधारण 1868 रुपये ठरवली होती. ग्रेड धानासाठी ती 1888 रुपये इतकी निश्चित करण्यात आली. मात्र, धान उत्पादक शेतकरी अडचणीत असल्यामुळे प्रोत्साहनपर राशी देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु होता. त्यानंतर धान उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे प्रोत्साहनपर 700 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. केवळ ऑनलाईन खरेदी होणाऱ्या धानासाठीच ही प्रोत्साहनपर रक्कम मिळेल. या वर्षी 1 कोटी 78 लाख क्विंटल इतकी धान खरेदी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

शुक्रवारपासून कापूस खरेदी केंद्रे सुरु

राज्यातील कापूस खरेदी केंद्रे सुरु करून त्यांच्यामार्फत कापूस खरेदीस सुरुवात होत आहे. यासंदर्भात मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत पणन विभागाचे प्रधान सचिव यांनी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाद्वारे पहिल्या टप्प्यामध्ये शुक्रवारपासून (27 नोव्हेंबर) एकूण 16 कापूस उत्पादक जिल्ह्यातील 21 केंद्रांमध्ये तसेच 33 जिनिंग मिलमध्ये कापूस खरेदी केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये निविदेस प्रतिसाद न मिळालेल्या बीड, परभणी आणि जळगाव अशा 3 जिल्ह्यांत एकूण 9 कापूस खरेदी केंद्रे डिसेंबर 2020 च्या पहिल्या आठवडयामध्ये सुरु होणार आहेत.

प्रधान सचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा 42.86 लाख हेक्टरमध्ये कापूस पेरा झालेला आहे. या वर्षी 450 लाख क्विंटल कापसाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्रीय कापूस खरेदी निगम (CCI) आणि महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ यांच्यातर्फे खरेदीचे नियोजन करण्यात आले आहे.

सिंधुदूर्ग येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

सिंधुदुर्ग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच, जिल्हा सामान्य रुग्णालयात आणखी 500 रुग्णांवर उपचार होईल, असे रुग्णालय संलग्न करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

हे नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 2021-22 मध्ये सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. त्या अनुषंगाने 30 नोव्हेंबर 2020 पूर्वी केंद्र शासन तसेच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी एकूण रुपये 966.08 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, आवश्यक तेवढी पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यासदेखील मान्यता देण्यात आली आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय स्थावर जंगम मालमत्तेसह (किमान 20 एकर जागेसह) कायमस्वरूपी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागास नि:शुल्क वापरास हस्तांतरित करण्यात येणार आहे.(Three important decision of Maharashtra Cabinet)

संबंधित बातम्या :

ऊर्जा मंत्री म्हणाले वीजबिल भरावेच लागेल, आता वडेट्टीवार म्हणतात, लोकांच्या भावना तीव्र, मंत्रिमंडळात चर्चा करु

झटका कायम! वाढीव वीजबिलातून दिलासा नाहीच, मंत्रिमंडळ बैठकीतील 3 निर्णय

सामान्यांना वीजबिलाचा ‘शॉक’, ठाकरे सरकार दिलासा देणार? मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक