शाळेची भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू, तीन जखमी

अमरावती: शाळेची भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अमरावतीत घडली. या दुर्घटनेत तीन विद्यार्थी जखमी आहेत. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमरावती जिल्यातील आष्टी येथील मणिबाई छगनलाल देसाई शाळेची भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. वैभव हरीदास गांवंडे असं 14 वर्षीय मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. तो देवरी निपानीचा रहिवासी होता. तर […]

शाळेची भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू, तीन जखमी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

अमरावती: शाळेची भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अमरावतीत घडली. या दुर्घटनेत तीन विद्यार्थी जखमी आहेत. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमरावती जिल्यातील आष्टी येथील मणिबाई छगनलाल देसाई शाळेची भिंत कोसळून ही दुर्घटना घडली.

वैभव हरीदास गांवंडे असं 14 वर्षीय मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. तो देवरी निपानीचा रहिवासी होता. तर या दुर्घटनेत आष्टीचा 14 वर्षीय प्रतिक विलास पायतले, सार्थक जगदीश भुजाडे आणि आदित्य महादेव बुध रा. अनकवाडी हे तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

शाळेची मधली सुट्टी झाली होती. त्यामुळे हे विद्यार्थी शाळेच्या मागील बाजूला खेळायला गेले होते. या शाळेच्या इमारतीची मागील भिंत अत्यंत तकलादू होऊन मोडकळीस आली होती. त्यामुळे ती भिंत पडली. या भिंतीखाली दबून वैभव गावंडे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. शाळेच्या परिसरात ही दुर्घटना घडल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना जबर धक्का बसला आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.