Pandharpur accident : रेल्वे रूळ ओलांडताना धडक बसली, तीन कामगारांचा मृत्यू, पंढरपूरमधली घटना

एकूण चार कामगार पहाटे रूळ ओलांडताना ही घटना घडली. त्यातील तिघांचा मृत्यू आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. पंढरपूर रेल्वे स्टेशनजवळ ही दुर्दैवी घटना घडली.

Pandharpur accident : रेल्वे रूळ ओलांडताना धडक बसली, तीन कामगारांचा मृत्यू, पंढरपूरमधली घटना
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 11:27 AM

पंढरपूर : रेल्वे रळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत तिघांचा मृत्यू (Died) झाला आहे. मिरजवरून कुर्डुवाडीकडे जाणाऱ्या मालगाडीची धडक त्यांना बसली. धडक बसलेले कामगार दुसऱ्या राज्यातील होते. एकूण चार कामगार पहाटे रूळ ओलांडताना ही घटना घडली. त्यातील तिघांचा मृत्यू आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. पंढरपूर रेल्वे स्टेशनजवळ (Pandharpur accident) ही दुर्दैवी घटना घडली. अत्यंत भीषण असा हा अपघात होता. या अपघातात मृत्यू झालेल्या मजुरांचे शरीर धडावेगळे झाले होते. हा अपघात झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. सकाळी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोकांनी अपघातस्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मध्यरात्री ही अपघाताची घटना घडली. सकाळी लवकर याची माहिती पोलिसांना (Police) समजली. हे सर्वजण बिहार, छत्तीसगडचे असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

मद्यपान केल्याने अपघात?

अपघात झाला त्याठिकाणी दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत. त्यामुळे मद्यपान केल्याने अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रात्री अवैधरीत्या विक्री होणारी दारू आणि दारू घेण्यासाठी रेल्वे रुळावर गेल्यामुळे हा अपघात घडला असावा, अशी चर्चा सुरू आहे. ही धडक बसली त्यावेळी तिघे मजूर ठार झाले. त्यांना तातडीने तिथे असणाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र चौघांपैकी तिघांचा मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.

हे सुद्धा वाचा

रेल्वेच्या सूचनांकडे दुर्लक्ष

रेल्वे रूळ ओलांडू नये, प्रवास करताना खबरदारी घ्यावी, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करू नये, अशाप्रकारच्या सूचना रेल्वे तसेच पोलीस प्रशासनाकडून वारंवार दिल्या जात असतात. मात्र अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. भरधाव वेगात येणाऱ्या रेल्वेगाडीपासून दूर राहण्याच्याही सूचना रेल्वेतर्फे देण्यात येतात. मात्र प्रवाशांकडून त्याकडे कानाडोळा होतो आणि त्यातच दुर्घटना घडतात. दरम्यान, या कामगारांचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यांची ओळख अद्याप पटवण्यात यश आलेले नाही. यानिमित्ताने पुन्हा एकदा नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.