तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात वायुगळती, तीन कामगारांचा मृत्यू

पालघर : बोईसर येथील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील (एमआयडीसी) स्क्वेअर केमिकल या कंपनीत वायुगळती झाल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांचा उपचार करत असलेल्या डॉक्टरांनाही या वायुगळतीची बाधा झाल्याने त्यांनाही आयसीयूमध्ये दाखल करण्याची वेळ आली आहे. या घटनेनंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी तात्काळ परिसरातील इतर कारखाने रिकामे केले आहेत. या दुर्घटनेत कारखाना व्यवस्थापक प्रभाकर खडसे (वय …

तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात वायुगळती, तीन कामगारांचा मृत्यू

पालघर : बोईसर येथील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील (एमआयडीसी) स्क्वेअर केमिकल या कंपनीत वायुगळती झाल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांचा उपचार करत असलेल्या डॉक्टरांनाही या वायुगळतीची बाधा झाल्याने त्यांनाही आयसीयूमध्ये दाखल करण्याची वेळ आली आहे. या घटनेनंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी तात्काळ परिसरातील इतर कारखाने रिकामे केले आहेत. या दुर्घटनेत कारखाना व्यवस्थापक प्रभाकर खडसे (वय 59), रघुनाथ गोराई (वय 50), दत्तात्रेय घुले (वय 25) यांचा मृत्यू झाला आहे.

एमआयडीसीतील प्लॉट नंबर एन 60 येथील स्क्वेअर केमिकल या रासायनिक कारखान्यात रविवारी दुपारी 3.45 वाजताच्या सुमारास कारखान्यातील आरएम 2 या स्टोरेज टँकमध्ये सोलव्हंट भरण्याचं काम सुरु होतं. यावेळी अचानक सोलव्हंट टँक फाटला. त्यामुळे ते रसायन बाहेर पडले आणि त्यातून विषारी वायू बाहेर पडला. कारखान्यातील तीन कामगारांना या विषारी वायुची बाधा झाली. त्यानंतर त्यांना एमआयडीसी येथील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे या कामगारांचा मृत्यू झाला. या कामगारांवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनाही या विषारी वायुची बाधा झाली. या डॉक्टरांना सध्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल आहे.

ही दुर्घटना घडून चार ते पाच तास उलटले, तरी कंपनीचे मालक कामगारांची विचारपूस करण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे रुग्णालयाबाहेर मृत कामगारांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांना समजवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, बोईसर तारापूर एमआयडीसी वसाहतीत अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार घडत असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळे कामगारांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे कंपनी मालकांवर कठोर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा मृतांच्या नातेवाईकांनी घेतला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *