शिवसेना आमदाराच्या कंपनीकडून तिवरे धरणाचं बांधकाम

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. हे धरण बांधलेली खेमराज कन्ट्रक्शन कंपनी आरोपीच्या पिंजऱ्यात आहे.

Tiware Dam breached : Officials did not act on complaints of cracks in Tiware dam said Shiv Sena MLA Sadanand Chavan khemraj construction, शिवसेना आमदाराच्या कंपनीकडून तिवरे धरणाचं बांधकाम

Tiware Dam breached रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. हे धरण बांधलेली खेमराज कन्ट्रक्शन कंपनी आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. महत्त्वाचं म्हणजे खेमराज कन्ट्रशन कंपनी चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण आणि त्यांच्या बंधूची आहे. धरणाला लागलेल्या गळतीप्रकरणी आता खेमराज कन्ट्रक्शन कंपनी जवाबदार असल्याचे आरोप होत आहे. पण हे सर्व आरोप आमदार सदानंद चव्हाण यांनी फेटाळून लावलेत.

हे धरण मातीचे बांधण्यात आले होते. तब्बल 20 वर्षानंतर धरण बांधलेल्या कंपनीला कसं काय दोषी धरलं जावू शकतं असा सवाल सदानंद चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.  शिवाय आपण लोकप्रतिनिधी असल्यानं आपल्याला गुंतवलं जात असल्याचा आरोप सदानंद चव्हाण यांनी केला.

खेमराज कनस्ट्रकशन यात दोषी नसल्याचा दावा त्यांनी केला. शिवाय अधिकाऱ्यांनी या धरणाच्या डागडुजीसंदर्भात योग्य ती पावले उचलायला हवी होती असंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, चिपळूणमधील तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत गावकऱ्यांनी तक्रार केली होती, अशी कबुली राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

तुफान पावसाने धरण फुटलं

कोकणातील तुफान पावसाने चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले. चक्क धरण फुटल्याने पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने 24 जणांना वाहून नेले. त्यापैकी 11 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.  सकाळी पावणे 10 पर्यंत पाच जणांचे मृतदेह हाती आले असून, बेपत्ता नागरिकांचा शोध सुरु आहे. या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेने थरकाप उडाला. धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरं वाहून गेली आहे. तर आजूबाजूच्या गावात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 

संबंधित बातम्या 

Tiware Dam Breached : तिवरे धरण फुटलं, नेमकं काय घडलं?  

Tiware Dam breached : फुटलेल्या तिवरे धरणाचे फोटो 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *