Tiware Dam Breached : 16 मृतदेह हाती, 8 बेपत्तांचा शोध, तिवरे पीडितांना घरं बांधून देणार

कोकणातील तुफान पावसाने चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले. चक्क धरण फुटल्याने पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने 24 जणांना वाहून नेले.

Tiware Dam Breached : 16 मृतदेह हाती, 8 बेपत्तांचा शोध, तिवरे पीडितांना घरं बांधून देणार
Tiware Dam breached
Follow us
| Updated on: Jul 04, 2019 | 9:26 AM

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटून आता 36-37 तास उलटले आहेत. धरणाच्या पाण्यात वाहून गेलेल्या 24 पैकी 16 जणांचे मृतदेह सापडले आहेत, मात्र 8 जण अद्याप बेपत्ता आहेत. एनडीआरएफ आणि विविध बचाव पथकं अविरतपण या बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत. कोकणातील तुफान पावसाने चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेने थरकाप उडाला. धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरं वाहून गेली आहे. तर आजूबाजूच्या गावात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 

दरम्यान, तिवरे धरणफुटीचे खापर आचारसंहितेवर फोडण्यात येत आहे. आचारसंहितेमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचं सांगण्यात येत आहे. जलसंपदा विभागात प्राथमिक चौकशीला सुरूवात करण्यात येणार आहे. आचारसंहितेमुळे 14 कोटी 17 लाखांचा निधी अडकून पडल्याची माहिती मिळत आहे.

मृतांच्या वारसांना 5 लाख, पीडितांना घरं बांधून देणार

तिवरे धरण दुर्घटनास्थळाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली. तिवरे धरण परिसरात जाऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. सरकार दुर्घटनाग्रस्तांना घरं बांधून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच दोषींवर कडक करावाई करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा

तिवरे धरण फुटल्यामुळे झालेले मृत्यू सरकारच्या अनास्थेचे बळी आहेत. त्यामुळे सरकारवर 302 अर्थात खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने धरणाचे बांधकाम केले होते. आमदार आणि कंपनीवर गुन्हा दाखल करावा. नैतिक जबाबदारी घेऊन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

नेमकं काय घडलं?

कोकणसह राज्यभरात गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाने कहर माजवला आहे. त्याचाच परिणाम म्हणून तिवरे-खडपोली धरण मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास भरलं. आधीच धरण ओव्हरफ्लो झाल्याने त्याचा धोका स्थानिकांच्या लक्षात आला. काही क्षणात धरणाला भगदाड पडलं आणि एकच खळबळ उडाली. नागरिकांनी याची माहिती प्रशासनालाही दिली.

कोणती गावं पाण्याखाली?

चक्क धरण फुटल्याने धरण क्षेत्रात येणाऱ्या ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावात पाणी घुसलं. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की या त्यामध्ये 24 नागरिक वाहून गेले. अनेक घरात पाणी घुसलं. प्रापंचिक साहित्य विस्कटून गेलं.  धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरं वाहून गेली आहे. तर आजूबाजूच्या गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

तिवरे धरण

फुटलेल्या तिवरे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2 हजार 452 दशलक्ष घनफूट इतकी होती. या धरणाची लांबी 308 मीटर तर उंची 28 मीटर आहे. 2004 मध्ये या धरणातील गाळ उपसण्यात आला होता.

संबंधित बातम्या 

Tiware Dam Breached : तिवरे धरण फुटलं, नेमकं काय घडलं?

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.