LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

, LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
, LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

मुंबईतील तिघांचा नदीमध्ये बुडून मृत्यू

रायगड : मुंबईतील तीन तरुणांचा नदीमध्ये बूडून मृत्यू झाला आहे. ही घटना रोहा तालुक्यातील बल्ले गावातील नदीमध्ये घडली. महेश जेजुरीकर (39), अक्षय गणगे (29) आणि परेश जेजुरीकर अशी मृत झालेल्यांची नावं आहेत.

17/06/2019,8:37AM
, LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

महिला शौचालयात मृत नवजात अर्भक सापडले

पुणे : मावळ देहुरोड गांधीनगर येथील महिला शौचालयात स्त्री जातीचे मृत नवजात अर्भक आढळले, अर्भक सापडल्यामुळे परिसरात एकच खळबळ, अज्ञात व्यक्ती विुद्ध गुन्हा दाखल, काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी अर्भक सापडले होते.

17/06/2019,8:24AM
, LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत

17/06/2019,8:13AM
, LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

राज्यासह देशभरातील डॉक्टर आज संपावर

कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणामुळे राज्यासह देशभरातील डॉक्टर आज संपावर जाणार आहेत. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज (17 जून) संपाची हाक दिली आहे. खासगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर संपावर गेल्यास रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

17/06/2019,7:31AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *