राज्यासह देशभरातील डॉक्टर आज संपावर

कोलाकात येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून राज्यासह देशभरातील डॉक्टर आज (17 जून) संपावर जाणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नेतृत्वात हा संप होणार आहे.

राज्यासह देशभरातील डॉक्टर आज संपावर

मुंबई : कोलाकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून राज्यासह देशभरातील डॉक्टर आज (17 जून) संपावर जाणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नेतृत्वात हा संप होणार आहे. या संपामुळे अनेक रुग्णांचे हाल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डॉक्टरांवर सतत होणारे जीवघेणे हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा तयार करण्यात यावा. डॉक्टरांना सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी, अशी मागणी आयएमएने केली आहे.

डॉक्टरांच्या संपामुळे आज पूर्ण दिवस ओपीडीसह सर्व वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत. या संपाला मार्ड, परिचारिका संघटना, रेडिओलॉजी असोसिएशनीही पाठिंबा दिला आहे. या संपा दरम्यान, सरकारी रुग्णालयातील डॉक्टर काळ्या फिती लावून संपाला पाठिंबा देणार आहेत. डॉक्टरांच्या 24 तासांच्या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

“डॉक्टरांवर सतत जीवघेणे हल्ले होत असल्यामुळे त्यांना कडक सुरक्षा देण्यात यावी. तसेच कडक कायदा तयार करण्यात यावा. सुरक्षा देऊनही डॉक्टरांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत यासाठी आम्ही कामबंद आंदोलन केले आहे. या आंदोलनामुळे रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास व्हावा अशी डॉक्टरांची भूमिका नाही”, असं आयएमएने सांगितले.

“डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम होणार असल्याने सरकारी रुग्णालयातील डॉक्टर काळ्या फिती लावून निषेध नोंदवणार आहेत. यामध्ये केईएम आणि जेजे रुग्णालयासह इतर सरकारी डॉक्टरांचा समावेश असणार आहे. मार्डचा या संपाला पाठिंबा असला, तरी सरकारी रुग्णालयातील रुग्णसेवा बंद राहणार नसल्याचे केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले”.

संबधित बातम्या : 

Doctors Strike : देशभरातील डॉक्टर रस्त्यावर, बंगालमध्ये 4 दिवसांपासून संप, 28 रुग्णांचा मृत्यू

पश्चिम बंगालच्या डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा, महाराष्ट्रातील डॉक्टर एक दिवसीय संपावर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *