LIVE : भाजपची जळगावात बैठक, खडसे अखेर दुपारी हजर

LIVE : भाजपची जळगावात बैठक, खडसे अखेर दुपारी हजर
Picture

भाजपच्या बैठकीला खडसे उशिरा हजर

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अखेर पक्षाच्या विभागवार बैठकीला हजर, कन्या रोहिणी खडसे, सून रक्षा खडसेही उपस्थित, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन सकाळपासून बैठकीला, खडसेंच्या अनुपस्थितीमुळे नाराजीच्या चर्चा

07/12/2019,3:37PM
Picture

चुनाभट्टी अपघात : तरुणीचा मृतदेह कुटुंबीयांनी स्वीकारला

मुंबई : चुनाभट्टी परिसरातील अपघातात 23 वर्षीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणी तिघे जण पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांच्या कारवाईबाबत समाधानी, मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंब राजी

07/12/2019,3:14PM
Picture

चंद्रपूर येथे बापाकडून मुलाची हत्या

चंद्रपूर येथे बापाकडून मुलाची हत्या करण्यात आली आहे. घरगुती कलह आणि व्यसनाधीन मुलासोबत सतत वाद होत असल्यामुळे ही हत्या झाल्याचे बोललं जात आहे. हत्येनंतर आरोपी बापाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा कबूल केला.

07/12/2019,2:58PM
Picture

छेडछाड करणाऱ्या तरुणाचा पीडित मुलीकडून चोप

कुर्ल्यावरुन ट्रेन पकडत असताना एका मुलाने मुलीची छेड काढली. त्यामुळे पीडित मुलीने थेट आरोपीला चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

07/12/2019,2:49PM
Picture

भाजपची जळगावात बैठक, खडसे अद्याप गैरहजर

जळगाव : भाजपच्या विभागीय कोअर कमिटी बैठकीला थोड्याच वेळात होणार सुरुवात, चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल, सुभाष भामरे, स्थानिक आमदार आणि कार्यकर्ते बैठकस्थळी हजर, मात्र एकनाथ खडसे अद्याप उपस्थित नाहीत

07/12/2019,12:51PM
Picture

नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवणार, मुंबई मनपाचा निर्णय

मुंबई मनपा प्रशासनाने नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवण्याचा निर्णय घेताल आहे. नाट्यगृहात प्रयोगादरम्यान प्रेक्षकांकडून फोनचा वापर होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कलाकारांनीही अशी मागणी केली होती.

07/12/2019,12:23PM
Picture

कारच्या धडकेत 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू

चुनाभट्टी येथे कारच्या धडकेत 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. अर्चना पारठे असं या मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून अधिक चौकशी सुरु आहे. दरम्यान, तरुणीचा मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला असून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले जात आहे.

07/12/2019,11:10AM
Picture

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जळगावात, एकनाथ खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न

07/12/2019,10:59AM
Picture

पुण्यात पार्किंगच्या वादावरुन वाहनांची तोडफोड

पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे वाहन पार्क करण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणात एका टोळक्याने वाहनांची तोडफोड केली आहे. यामध्ये तीन ते चार वाहनांचे नुकसान झाले आहे. दोन व्यावसायिक टेम्पो, दोन खाजगी वाहनांचा समावेश आहे. एकाला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

07/12/2019,10:55AM
Picture

चोरट्यांकडून रोख रक्कमेसह एटीएममशीन लंपास

नागपूर येथे महामार्गालगत असलेल्या इंडियन ओवरसिज बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी पळवून नेले आहे. या मशीनमध्ये जवळपास दोन लाख 83 हजार 600 रुपये होते. ही घटना काल (6 डिसेंबर) मध्य रात्री 3 वाजता घडली. नागपूर पोलीस चोरट्यांचा अधिक तपास करत आहेत.

07/12/2019,10:51AM
Picture

हैद्राबाद एन्काऊंटर फेम सी सज्जनार यांच्या समर्थनाथ रायगड शहरात होर्डिंग

07/12/2019,10:46AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *