LIVE : कर्नाटकातील मंत्री डी के शिवकुमार मुंबई पोलिसांच्या ताब्यात

LIVE : कर्नाटकातील मंत्री डी के शिवकुमार मुंबई पोलिसांच्या ताब्यात
Picture

कर्नाटकातील मंत्री डी के शिवकुमार मुंबई पोलिसांच्या ताब्यात, हॉटेल रेनेन्सनजवळ जमावबंदीचं उल्लंघन केल्याने कारवाई

10/07/2019,2:57PM
Picture

राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज (10 जुलै) शिवसेनेत प्रवेश केला. दुपारी दीडच्या सुमारास बरोरा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनाभवन येथे प्रवेश केला.

10/07/2019,1:26PM
Picture

कर्नाटकचे आमदार असलेल्या रेनिसन्स हॉटेलमध्ये संचारबंदी लागू

10/07/2019,12:12PM
Picture

वर्ध्यात ट्रकवर रुग्णवाहिका धडकली, तीनजण गंभीर जखमी

उभ्या ट्रकवर रुग्णवाहिका धडकल्याने तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. नागपूर ते हैद्राबाद मार्गावरील जुनापाणी शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वणी येथून रुग्णाला नागपुर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना हा अपघात घडला. जखमींमध्ये कृष्णा पिदुरकर, नरेश पिदुरकर, महैश पिदुरकर यांचा समावेश आहे.

10/07/2019,11:17AM
Picture

सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

बीड: सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शेतातच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आलं आहे. ही धक्कादायक घटना माजलगाव तालुक्यातील बेलुरा येथील आहे. सुदाम फपाळ असं विष पिलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

10/07/2019,10:21AM
Picture

लष्कराच्या हद्दीत स्फोट, भंगार गोळा करण्यासाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू

10/07/2019,10:13AM
Picture

पालघरमध्ये भूकंपाचे सत्र सुरुच

डहाणू, बोर्डी, तलासरी परिसरात पहाटे पासून दोन वेळा भूकंपाचे धक्के, 9:02 मिनिटाने बसला दुसरा जोरदार धक्का, धक्का किती तीव्रतेचा होता अद्याप प्रशासनाकडून माहिती नाही

10/07/2019,9:18AM
Picture

तिवरे धरण प्रकरणी शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

10/07/2019,9:07AM
Picture

कर्नाटकचे मंत्री डी के शिवकुमार मुंबईत दाखल

कर्नाटकचे मंत्री डी के शिवकुमार मुंबईत दाखल, शिवकुमार काँग्रेस आमदारांची भेट घेणार

10/07/2019,8:15AM
Picture

मुख्यमंत्री दत्तक गावात दुषित पाण्यामुळे नागरिकांना अतिसाराची लागण

अमरावती : मेळघाटातील मुख्यमंत्री दत्तक गाव दहेंडा येथे दूषित पाण्यामुळे नागरिकांना अतिसाराची लागण, 60 लोकांवर समाज मंदिरात उपचार सुरु, ग्रामसेवकाने पावसाळा पूर्वीचे नियोजन न केल्याने लागण झाली

10/07/2019,7:58AM
Picture

कृष्णा नदी पात्रात लाखो मासे मृत

सांगली : कृष्णा नदी पात्रात लाखो मासे मृत, आमनापूर, धनगाव, औदुंबर, भिलवडी दरम्यान नदी पत्रात मृत माशांचा खच्च, मलमिश्रीत पाणी अथवा विषारी द्रव्य नदीत सोडल्याने मासे मृत्युमुखी पडल्याचा संशय

10/07/2019,7:51AM
Picture

जालन्यात अनोळखी इसमाचे प्रेत आढळले

जालना : जालन्यात अनोळखी इसमाचे प्रेत आढळल्याने जिल्ह्यात खळबळ, जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण परिसरातील घटना, संतोष रामकीसन बोराडे यांच्या शेतातील विहीरीत आढळला मृतदेह, टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मुत्त्युची नोंद

10/07/2019,7:46AM
Picture

राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा आज शिवसेनेत प्रवेश करणार

शहापुरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी काल (9 जुलै) आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिला, आज सेनाभवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेणार, प्रवेशासाठी शहापूर येथून 100 गाड्यांचा ताफा निघणार, त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते प्रवेश घेणार

10/07/2019,7:40AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *