LIVE : जव्हारमध्ये गरिबीला कंटाळून कुटुंबाची आत्महत्या

LIVE : जव्हारमध्ये गरिबीला कंटाळून कुटुंबाची आत्महत्या
Picture

गरिबीला कंटाळून कुटुंबाची आत्महत्या

गरिबीला कंटाळून कुटुंबाची आत्महत्या, जव्हार तालुक्यातील घटना, चिमुकली वृषाली वाचली, जव्हार कुटीर रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु

07/07/2019,11:37PM
Picture

सुटका केलेल्या अल्पवयीन मुलींना पुन्हा कुंटणखान्यात पाठवल्याप्रकरणी माजी पोलीस अधिकाऱ्याला अटक

सुटका केलेल्या अल्पवयीन मुलींना पुन्हा कुंटणखान्यात पाठवले, डीसीपी स्तरावरील चौकशीत उघड, नागपाडा पोलीस स्टेशनच्या माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह दलालास अटक

07/07/2019,11:30PM
Picture

नाशिकमध्ये अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर, नाशिक-त्र्यंबकेश्वर संपर्क तुटला

नाशिकमध्ये अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर, नाशिक-त्र्यंबकेश्वर संपर्क तुटला, त्र्यंबक रोडवरील पिंपळगाव बहुला येथे वाहतूक ठप्प

07/07/2019,7:34PM
Picture

जेजुरीतील पेशवे तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

जेजुरीतील पेशवे तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू, पोहायला गेलेले असताना दुर्घटना, आदर्श मनोहर उबाळे (वय7), आदित्य संभाजी कोळी (वय 8) अशी चिमुकल्यांची नावे

07/07/2019,7:27PM
Picture

जुन्या नाशिक परिसरातील वाडा कोसळला

जुन्या नाशिक परिसरातील वाडा कोसळला, वाडा कोसळण्यापूर्वीच लोकांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली, रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असल्याने घटना घडल्याचा अंदाज

07/07/2019,7:23PM
Picture

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा मिलिंद देवरा यांचा राजीनामा

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला आहे. 3-4 महिन्यातच मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

07/07/2019,3:04PM
Picture

तिवरे धरणफुटीत दिड वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला

तिवरे धरणफुटी दुर्घटना : दुर्घटनेनंतर आज सहाव्या दिवशी दिड वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला, आतापर्यंत 20 मृतदेह बाहरे काढण्यात पोलिसांना यश

07/07/2019,1:41PM
Picture

घरातील बाथरुममध्ये पडून 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

नागपूर : खेळताना घरातील बाथरुममधील पाण्याच्या टाकीत तोल जाऊन पडल्याने 3 वर्षीय चिमुकल्या मुलीचा मृत्यू, वंशिका मुकेश वर्मा, असं या मृत मुलीचे नाव आहे. कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

07/07/2019,1:16PM
Picture

9 जुलैपासून ऑटो रिक्षाचालक संपावर

9 जुलैपासून ऑटो रिक्षाचालक संपावर, मुंबईसह राज्यभरतील रिक्षाचालक संपावर जाणार, भाडेवाढी अन्य मागण्यांसह ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संपावर

07/07/2019,1:10PM
Picture

चंद्रपुरात क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणारे अटकेत

चंद्रपूर :-शहरातील सिस्टर कॉलनी परिसरात पोलिसांची धाड, भारत-श्रीलंका सामन्यावर सट्टा लावणारे 5 जण अटकेत, संगणक-लॅपटॉप-13 मोबाइल ताब्यात, सट्टेबाजांकडून 6 हजार रोख व दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, विश्वचषक क्रिकेट सामन्यादरम्यान सट्टेबाजांवरील पहिलीच कारवाई

07/07/2019,12:18PM
Picture

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु नितीन करमळकर यांच्यासह पाच जणांविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, कुलगुरु नितीन करमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार, सिनेट सदस्य संजय चाकणे, सुरक्षा संचालक सुरेश भोसले, सुरक्षा रक्षक अजित सिंगवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, आकाश भोसले या विद्यार्थ्यांची तक्रार

07/07/2019,11:02AM
Picture

इगतपुरीजवळ मालगाडी रुळावरुन घसरली

नाशिक : इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी रुळावरुन घसरली, इगतपुरीवरुन मुंबईच्या दिशेने गाडी निघताच ही घटना घडली, मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम नाही, घसरलेली मालगाडी पूर्ववत करण्याचं काम सुरु

07/07/2019,10:49AM
Picture

सायन-पनवेल मार्गावरील बत्तीच्या खांब्याला शॉक लागून तरुणाचा मृत्यू

सायन पनवेल मार्गावरील बत्तीच्या खांबाला शॉक लागून तरुणाचा मृत्यू, रात्री दीड वाजता सानपाडा बस स्टॉप वरील घटना, 35 वर्षीय सुरेश जुनघरे असं मृत व्यक्तीचे नाव, उघड्या केबल मुळे शॉक लागला, पिडब्लूडी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची नातेवाइकांची मागणी, गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा विरोध

07/07/2019,10:41AM
Picture

13 तासाने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरु

कोकणात काल (6 जून) मुसळधार पाऊस पडल्याने मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. चिपळूणमधील वाशिठी नदीवरील आणि खेड येथील जगबुडी नदीवरील वाहतूक खबरदारी म्हणून बंद करण्यात आली होती. मात्र तब्बल 13 तासाने ही वाहतूक सुरु केली आहे.

07/07/2019,8:14AM
Picture

मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर आज माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक, हार्बर मार्गावरील सर्व ट्रेन रद्द, ब्लॉक दरम्यान एकही ट्रेन हार्बर मार्गावर धावणार नाही, सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत मेगाब्लॉक

07/07/2019,8:02AM
Picture

खंडाळा गावठाणात वड, गुलमोहराची झाडे पडली

लोणावळा : पावसामुळे खंडाळा गावठाण येथे वड आणि गुलमोहराचे झाड एका गाडीवर पडले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही हानी नाही. पावसासोबत वारा देखील राहिल्याने खंडाळा येथे दोन मोठी झाडे पडली

07/07/2019,7:55AM
Picture

कोयना धरणात पावसाची संततधार

कोयना धरणातील पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु, महाराष्ट्रातील चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या नवजा येथे 24 तासात 280 मिली मिटर पावसाची नोंद

07/07/2019,7:52AM
Picture

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरड कोसळली

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरड कोसळली, सकाळी पहाटेच्या सुमारास दरड कोसळली, दरड बाजुला करण्याचे काम सुरु

07/07/2019,7:45AM
Picture

मुंबई-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबई-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, स्विफ्ट कार आणि ट्रकमध्ये जोरदार धडक

07/07/2019,7:43AM
Picture

उस्मानाबाद येथे गोळीबार

कळंब शहरातील साठे चौकात गोळीबार, पारधी समाजातील दोन गटात हाणामारी, काठ्या व तलवारीने मारहाणीत 3 जखमी, जखमी विकास पवार, राहुल पवार आणि बापू धोत्रे यांच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरु

07/07/2019,7:40AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *