नाशिकमध्ये टोईंग कर्मचाऱ्यांची मुजोरी, नांगरे पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

मुंबई : नाशिक शहरात टोईंग कर्मचाऱ्यांची मुजोरी प्रचंड वाढली आहे. सगळे नियम धाब्यावर बसवत नागरिकांचे वाहन उचलणाऱ्या या टोईंग कर्मचाऱ्यांची मजल आता नागरिकांवर हात उचलण्यापर्यंत गेली आहे. मंगळवारी (9मार्च) नाशिक शहरातील एका टोईंग कर्मचाऱ्याने नाशिकमधील नागरिकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे टोईंग नेमकं नाशिककरांच्या सोयीसाठी की त्यांच्या गैरसोयीसाठी आहे, असा संतप्त सवाल नाशिककर उपस्थित …

, नाशिकमध्ये टोईंग कर्मचाऱ्यांची मुजोरी, नांगरे पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

मुंबई : नाशिक शहरात टोईंग कर्मचाऱ्यांची मुजोरी प्रचंड वाढली आहे. सगळे नियम धाब्यावर बसवत नागरिकांचे वाहन उचलणाऱ्या या टोईंग कर्मचाऱ्यांची मजल आता नागरिकांवर हात उचलण्यापर्यंत गेली आहे. मंगळवारी (9मार्च) नाशिक शहरातील एका टोईंग कर्मचाऱ्याने नाशिकमधील नागरिकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे टोईंग नेमकं नाशिककरांच्या सोयीसाठी की त्यांच्या गैरसोयीसाठी आहे, असा संतप्त सवाल नाशिककर उपस्थित करत आहेत.

नाशिककरांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये आणि त्यांचा शहरात सुखकर प्रवास व्हावा या उद्देशानं शहर पोलीसांनी टोईंगचा प्रयोग सुरु केला. मात्र टोईंगची कारवाई सुरु झाल्याच्या काही दिवसातच नाशिककरांना या टोईंग कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तणुकीचा फटका बसू लागला. मंगळवारी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या समोर स्मार्ट रोडचं काम सुरु असल्यानं वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी टोईंग कर्मचाऱ्यांनी गाडी मालकांसमोर गाड्या उचलायला सुरुवात केली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या गाडी मालकांना सुरुवातीला दमदाटी करण्यात आली आणि नंतर थेट अंगावर धावून जात या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.

टोईंग कर्मचाऱ्यांची दादागिरी हा काही नवीन विषय नाही. कधी गाडीचालक उपस्थित असताना गाडी ओढून नेणं, कधी दमदाटी करत दंड वसूल करणे हे प्रकार रोजचेच झाल्यानं नाशिककर वैतागले आहेत. चूक असताना दंड भरण्यास नाशिककरांचा नकार नाही, मात्र चूक नसताना टोईंग कर्मचाऱ्यांची दादागिरी का सहन करायची असा संतप्त सवाल नाशिककर उपस्थित करत आहेत.

शहरात वाहतुकीला नियम लागावा यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्तांनी ही योजना सुरु केली होती. मात्र आयुक्तांची बदली होताच शहरात टोइंगधाड सुरु झाली. ज्या नाशिककरांच्या सोयीसाठी हा प्रयोग सुरु केला त्याच नाशिककरांच्या मुळावर हे टोईंग आल्यानं पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तात्काळ याची दखल घेऊन हा ठेका रद्द करावा अशी नाशिककरांची अपेक्षा आहे. आता यावर विश्वास नांगरे पाटील काय निर्णय घेतील याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *