EXCLUSIVE: महाराष्ट्रातील टॉप 5 लाचखोर कोण?

नागपूर: गेल्या वर्षात काय काय घडलं याबाबतचा आढावा 31 डिसेंबरच्या निमित्ताने घेतला जातो. राजकीय, आर्थिक, गुन्हे, शैक्षणिक, पर्यावरण, तंत्रज्ञान, मनोरंजन, शेती अशा विविध क्षेत्रातील घटनांचा मागोवा वर्षाअखेरीला घेतला जातो. तसंच राज्यातील लाचखोरी करणारे टॉप फाईव्ह विभाग कोणते याबाबतचा हा आढावा. महाराष्ट्रात 2018 या वर्षात लाचखोरीमध्ये चंद्रकांत दादा पाटील यांच्या महसूल विभागानं पुन्हा एकदा पहिला क्रमांक …

, EXCLUSIVE: महाराष्ट्रातील टॉप 5 लाचखोर कोण?

नागपूर: गेल्या वर्षात काय काय घडलं याबाबतचा आढावा 31 डिसेंबरच्या निमित्ताने घेतला जातो. राजकीय, आर्थिक, गुन्हे, शैक्षणिक, पर्यावरण, तंत्रज्ञान, मनोरंजन, शेती अशा विविध क्षेत्रातील घटनांचा मागोवा वर्षाअखेरीला घेतला जातो. तसंच राज्यातील लाचखोरी करणारे टॉप फाईव्ह विभाग कोणते याबाबतचा हा आढावा.

महाराष्ट्रात 2018 या वर्षात लाचखोरीमध्ये चंद्रकांत दादा पाटील यांच्या महसूल विभागानं पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकवला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रिपोर्टनुसार राज्यात 2018 मध्ये सर्वाधिक लाचखोरीत महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर लाचखोरीत दुसरा क्रमांक लागतो खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याचा अर्थात पोलिसांचा.

महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंध अर्थात एसीबीचा हा रिपोर्टच ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागला आहे. यानुसार 2018 महसूल विभाग लाचखोरीत अव्वल आहे.

2018 या एकाच वर्षात चंद्रकात पाटील मंत्री असलेल्या महसूल विभागात लाचखोरीची तब्बल 214 प्रकरणं समोर आली. यात तलाठ्यापासून ते वरच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यानंतर राज्यात लाचखोरीत दुसरा क्रमांक लागतो तो खुद्द मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृह खात्यातील पोलीसांचा. वर्षभरात तब्बल 195 पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकले.

खातं लाचखोरीची प्रकरणं लाचेची रक्कम
महसूल २१४ २,०६,१४,१००
पोलीस १९५ २४,६६,९००
पंचायत समिती ९० ८,००,१५०
महानगरपालिका ४७ १६,६८,५५०
जिल्हा परिषद ३३ ९,०२,३००

, EXCLUSIVE: महाराष्ट्रातील टॉप 5 लाचखोर कोण?

2018 या वर्षांतील लाचखोरीत अव्वल असलेले टॉप फाईव्ह सरकारी खाती आपण पाहिली. आता 2018  मध्ये राज्यातील एसीबीच्या परिक्षेत्रानुसार लाचखोरीत अव्वल पहिले पाच विभाग कुठले ते पाहूया.

विभाग एकूण सापळे
पुणे १९९
नागपूर १२१
औरंगाबाद ११८
नाशिक ११४
ठाणे १०३

, EXCLUSIVE: महाराष्ट्रातील टॉप 5 लाचखोर कोण?

2017 च्या तुलनेत राज्यात 2018 मध्ये लाचखोरीची जास्त प्रकरणं समोर आली आहेत. ‘हा भ्रष्टाचार खालून वरपर्यंत असून, ही लाचखोरी कमी करण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

सरकारी खात्यातील या लाचखोरीत क्लास वन पासून ते शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत सहभाग काही. काही दिवसांपूर्वीच नागपूर महानगरपालीकेच्या कर्मचाऱ्यांनी मोकाट कुत्रे पकडण्यासाठी लाच मागीतली होती. त्यामुळे लोक लाच कशासाठी मागतील आणि त्यासाठी त्यांची पातळी किती खालावेल याचा नेम नाही. पण पारदर्शक कारभाराचा आव आणणाऱ्या राज्यकर्त्यांना हे मात्र नक्कीच भूषणावह नाही.

, EXCLUSIVE: महाराष्ट्रातील टॉप 5 लाचखोर कोण?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *