TOP 9 Headlines | 13 मार्च 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

What's App Bulletin : आज 13 मार्च, 2022. पोलीस बदली घोटाळा प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर आज दिवसभरात राज्य आणि देशात अनेक महत्वाच्या घडामोडी पाहायला मिळाल्या. सोबतच मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रासह महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात टीव्ही 9 मराठीच्या व्हॉट्सअप बुलेटिनमधून

TOP 9 Headlines | 13 मार्च 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
टीव्ही 9 मराठी बुलेटीन
Image Credit source: TV9
सागर जोशी

|

Mar 13, 2022 | 6:22 PM

  1. पोलीस बदली घोटाळा प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा जबाब पोलिसांनी नोंदवला, ‘मला आरोपी, सहआरोपी केलं जाईल असे प्रश्न विचारले गेले’, पत्रकार परिषदेत फडणवीसांचा खळबळजनक दावा, तर ‘रसद’ केंद्रीय गृहसचिवांपर्यंत पोहचवल्याचीही माहिती – इथे क्लिक करा
  2. देवेंद्र फडणवीसांना एक नव्हे तर सहा नोटीस, जबाब नोंदवण्यात काही गैर नसल्याची गृहमंत्री वळसे-पाटलांची प्रतिक्रिया, केंद्रीय तपास यंत्रणांकडून थेट कारवाई, मग पोलिसांनी साधी माहितीही घ्यायची नाही का? भुजबळांचा सवाल, तर फडणवीस पुरून उरतील, ते कितीतरी ठाकरे-पवार खिशात घालून फिरतात; निलेश राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल – इथे क्लिक करा
  3. संजय राऊत रोज घाबरून पत्रकार परिषदा घेतात, फडणवीसांचा राऊतांना जोरदार टोला; तर फडणवीसांच्या ऐकण्यात आणि पाहण्यात काहीतरी दोष, राऊतांचा पलटवार, खोटं न बोलण्याचाही सल्ला – इथे क्लिक करा
  4. पंतप्रधान मोदींचा मुकाबला राहुल गांधीच करु शकतात, राहुल यांनी काँग्रेस अध्यक्ष व्हावं, अशोक गेहलोत यांची मागणी; पाच राज्यातील दारूण पराभवानंतर दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत विचारमंथन सुरु – इथे क्लिक करा
  5. गोव्यात मुख्यमंत्री पदावरून प्रमोद सावंत, विश्वजीत राणेंमध्ये शीतयुद्ध; जाहिरातीतून सावंतांचा फोटो गायब; तर सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा पाठिंबा घेण्याबाबतही भाजपामध्ये मतभेद – इथे क्लिक करा
  6. प्रवीण चव्हाणांचं स्टिंग ऑपरेशन केल्याचे आरोप तेजस मोरेंनी फटाळले; चौकशीनंतर सत्य समोर येईल, मोरेची प्रतिक्रिया; तर रेकॉर्डिंग खरं आहे तर ते बाहेर आणण्यासाठी दोन-तीन महिने का लागले? प्रवीण चव्हाण यांचा सवाल – इथे क्लिक करा
  7. जत्रा पहायला गेलेल्या मुलींवर खुलेआम लैंगिक अत्याचार! मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना, व्हिडीओ व्हायरल – इथे क्लिक करा, तर सोलापुरात बारबालांवर पैशांची उधळण, ऑर्केस्ट्रा बारमधील 49 जणांवर कारवाई, 60 लाखांचा मुद्देमाल जप्त – इथे क्लिक करा
  8.  ‘बच्चन पांडे’च्या प्रमोशनसाठी खिलाडी कुमारसह क्रिती आणि जॅकलिन थेट रस्त्यावर, पाहा फोटो – इथे क्लिक करा, ‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईत लक्षणीय वाढ; दोन दिवसांत जमवला बारा कोटींचा गल्ला – इथे क्लिक करा
  9. बुमराहने 5 विकेट्ससह श्रीलंकेचं कंबरडं मोडलं, कपिल-इरफानचे रेकॉर्ड मोडीत – इथे क्लिक करा, स्टेडियममध्ये रोहितच्या सिक्सने चाहत्याचं नाक फुटलं, रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल – इथे क्लिक करा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें