नाशिक जिल्ह्यात 636 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 1 हजार 458 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 636 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यात 636 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 3:59 PM

नाशिकः जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 1 हजार 458 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 636 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 678 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशकात 23, बागलाण 8, चांदवड 27, देवळा 16, दिंडोरी 18, इगतपुरी 4, कळवण 6, मालेगाव 3, नांदगाव 7, निफाड 102, सिन्नर 94, सुरगाणा 1, त्र्यंबकेश्वर 1, येवला 44 असे एकूण 354 पॉझिटीव्ह रुग्णांचा समावेश आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 242, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 10 तर जिल्ह्याबाहेरील 30 रुग्ण असून असे एकूण 636 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 10 हजार 772 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नाशिक 2, बागलाण 1, चांदवड 4, देवळा 2, दिंडोरी 6, इगतपुरी 3, नांदगाव 1, निफाड 15, सिन्नर 7, सुरगाणा 1, येवला 8 असे एकूण 50 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे 97.10 टक्के, नाशिक शहरात 98.17 टक्के, मालेगावमध्ये 97.10 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.73 इतके आहे. नाशिक ग्रामीण 4 हजार 197 नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 3 हजार 998 मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 357 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 678 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

विद्यार्थ्यांचे लसीकरण

नाशिकच्या कॉलेजमध्ये आजपासून 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता मंत्री उदय सामंत यांनी तशा सूचना दिल्या आहेत. नाशिकमध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. विशेषतः सिन्नर, निफाड आणि येवला हे हॉटस्पॉट झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नाशिक शहरातील महाविद्यालयांमध्ये 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही लस घ्यायला लावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने ही तयारी केली आहे. त्यामुळे कोरोनाची धास्ती घेतलेले पालक आणि विद्यार्थी या दोघांनाही दिलासा मिळणार आहे.

मुबलक डोसचा पुरवठा

एकीकडे संपूर्ण देशात शंभर कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असताना, दुसरीकडे नाशिक विभागाने विभागाने राज्यात विक्रमी आघाडी घेत तब्बल 1 कोटी 29 लाख 34 हजार 893 नागरिकांचे लसीकरण केले आहे. नाशिक विभागाला पुरेसा लससाठा प्राप्त झाल्यामुळे हे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे. नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांसाठी वेळोवेळी कोव्हॅक्सिन 15,99,370 डोसेस आणि कोविडशिल्ड 1,17,61,820 डोसेस शासनाकडून प्राप्त झाले आहेत. या दोन प्रकारच्या कोरोना लसीचे एकूण 1,33,61,190 डोसेस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी विभागात 1, 29, 34, 893 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तांकडून देण्यात आली.

इतर बातम्याः

मोहमयी सोनं होतंय स्वस्त, जाणून घ्या नाशिक सराफातील भाव!

नॅशनल चॅम्पियन स्पर्धेतील विजयी खेळाडूंच्या पाठीवर पालकमंत्र्यांकडून कौतुकाची थाप

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.