नाशिक जिल्ह्यात 706 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी 706 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 11 ने घट झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यात 706 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 5:02 PM

नाशिक: नाशिक जिल्ह्यात मंगळवारी 706 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 11 ने घट झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 1 हजार 68 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 706 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 11 ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 40, बागलाण 6, चांदवड 28, देवळा 5, दिंडोरी 23, इगतपुरी 1, कळवण 10, मालेगाव 06, नांदगाव 11, निफाड 126, सिन्नर 135, त्र्यंबकेश्वर 8, येवला 61 अशा एकूण 460 जणांचा समावेश आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 213, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 9 तर जिल्ह्याबाहेरील 24 रुग्ण असून एकूण 706 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 10 हजार 401 रुग्ण आढळून आले आहेत.

विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू

नाशिकच्या कॉलेजमध्ये आजपासून 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता मंत्री उदय सामंत यांनी तशा सूचना दिल्या आहेत. नाशिकमध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. विशेषतः सिन्नर, निफाड आणि येवला हे हॉटस्पॉट झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नाशिक शहरातील महाविद्यालयांमध्ये 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही लस घ्यायला लावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने ही तयारी केली आहे. त्यामुळे कोरोनाची धास्ती घेतलेले पालक आणि विद्यार्थी या दोघांनाही दिलासा मिळणार आहे.

नाशिकमध्ये विक्रमी लसीकरण

एकीकडे संपूर्ण देशात शंभर कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असताना, दुसरीकडे नाशिक विभागाने विभागाने राज्यात विक्रमी आघाडी घेत तब्बल 1 कोटी 29 लाख 34 हजार 893 नागरिकांचे लसीकरण केले आहे. नाशिक विभागाला पुरेसा लससाठा प्राप्त झाल्यामुळे हे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे.

मुबलक डोसचा पुरवठा

नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांसाठी वेळोवेळी कोव्हॅक्सिन 15,99,370 डोसेस आणि कोविडशिल्ड 1,17,61,820 डोसेस शासनाकडून प्राप्त झाले आहेत. या दोन प्रकारच्या कोरोना लसीचे एकूण 1,33,61,190 डोसेस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी विभागात 1, 29, 34, 893 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तांकडून देण्यात आली.

इतर बातम्याः

पाच महिन्यांपासून निफाडच्या आशा सेविकांचे पगार नाहीत; गोड दिवाळी जाणार कडू, आनंदावर विरजण

नाशिककरांचं अनोखं पर्यावरण प्रेमः 100 झाडांनी बहरलेल्या उद्यानाचा जंगी वाढदिवस साजरा!

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.