नाशिक जिल्ह्यात 732 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; निफाड, सिन्नरमध्ये पुन्हा वाढ

नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत 732 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात निफाड येथील 122, सिन्नर 118 आणि येवला येथील 58 रुग्णांचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात 732 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; निफाड, सिन्नरमध्ये पुन्हा वाढ
संग्रहित छायाचित्र.


नाशिकः नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत 732 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात निफाड येथील 122, सिन्नर 118 आणि येवला येथील 58 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 879 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 46 ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 662 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. सध्या उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 50, बागलाण 7, चांदवड 24, देवळा 7, दिंडोरी 32, इगतपुरी 5, कळवण 17, मालेगाव 5, नांदगाव 11, निफाड 122, पेठ 1, सिन्नर 118, त्र्यंबकेश्वर 10, येवला 58 अशा एकूण 467 पॉझिटीव्ह रुग्णांचा समावेश आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 229, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 8 तर जिल्ह्याबाहेरील 28 रुग्ण असून, अशा एकूण 732 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 10 हजार 273 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे 97.00 टक्के, नाशिक शहरात 98.17 टक्के, मालेगाव मध्ये 97.09 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.34 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के इतके आहे.

तीनच तालुक्यात रुग्णवाढ का?
नाशिक जिल्ह्यात आणि विभागात विक्रमी लसीकरण होऊनही निफाड, येवला आणि सिन्नर तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतानाच दिसतायत. विशेषतः नगर जिल्ह्याचा सिन्नर तालुक्याशी संबंध येतो. नगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे नुकतेच अनेक गावांमध्ये लॉकडाऊन करावे लागले होते. त्याचाच संसर्ग नाशिक जिल्ह्यातल्या या तालुक्यांमध्ये होत असल्याची शंका आहे. हे पाहता लसीकरणाला अजून वेग द्यावा. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

विभागात लसीकरण जोरात

नाशिक विभागाने विभागाने राज्यात विक्रमी आघाडी घेत तब्बल 1 कोटी पावणेपंधरा लाख डोस नागरिकांना टोचले आहेत. नाशिक विभागात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यात लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. नाशिक जिल्ह्याची एकूण लोकसंख्या तब्बल 70 लाख 43 हजार 943 आहे. यापैकी 51 लाख 75 हजार 889 इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे. यापैकी 44 लाख 75 हजार 70 जणांना डोस देण्यात आले आहेत. त्यात 18 ते 44 वयोगटाचे सर्वाधिक 24 लाख 89 हजार 784 जणांचे लसीकरण झाले आहे. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 32 लाख 65 हजार 303 आहे. तर अजून 19 लाख 10 हजार 586 नागरिकांचे लसीकरण व्हायचे आहे.

इतर बातम्याः

कार्यालयात हेल्मेटशिवाय प्रवेश नाही; नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांची अनोखी मोहीम

चर्चा तर होणारचः शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत उद्यापासून नाशिक दौऱ्यावर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI