नाशिक जिल्ह्यात 734 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; सिन्नर, निफाड सव्वाशेच्या घरात

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 917 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 734 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यात 734 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; सिन्नर, निफाड सव्वाशेच्या घरात
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 4:48 PM

नाशिकः जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 917 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 734 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 663 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 44, बागलाण 8, चांदवड 25, देवळा 7, दिंडोरी 31, इगतपुरी 2, कळवण 16, मालेगाव 7, नांदगाव 11, निफाड 123, पेठ 1, सिन्नर 129, त्र्यंबकेश्वर 10, येवला 62 असे एकूण 476 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 223, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 8 तर जिल्ह्याबाहेरील 27 रुग्ण असून असे एकूण 734 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 10 हजार 314 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल शुक्रवारी आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये बागलाण 1, चांदवड 3, देवळा 1, दिंडोरी 1, कळवण 1, मालेगाव 2, निफाड 8, सिन्नर 5, येवला 7 अशा एकूण 29 पॉझिटीव्ह रुग्णांचा समावेश आहे.

निफाड, येवला, सिन्नरमध्ये वाढ

नाशिक जिल्ह्यात आणि विभागात विक्रमी लसीकरण होऊनही निफाड, येवला आणि सिन्नर तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतानाच दिसतायत. विशेषतः नगर जिल्ह्याचा सिन्नर तालुक्याशी संबंध येतो. नगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे नुकतेच अनेक गावांमध्ये लॉकडाऊन करावे लागले होते. त्याचाच संसर्ग नाशिक जिल्ह्यातल्या या तालुक्यांमध्ये होत असल्याची शंका आहे. हे पाहता लसीकरणाला अजून वेग द्यावा. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

नाशिकमध्ये लसीकरण वेगात

एकीकडे संपूर्ण देशात शंभर कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असताना, दुसरीकडे नाशिक विभागाने विभागाने राज्यात विक्रमी आघाडी घेत तब्बल 1 कोटी 29 लाख 34 हजार 893 नागरिकांचे लसीकरण केले आहे. नाशिक विभागाला पुरेसा लससाठा प्राप्त झाल्यामुळे हे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण 45 लाख 12 हजार 691 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 32 लाख 90 हजार 262 जणांनी पहिला डोस घेतला असून 12 लाख 22 हजार 429 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

अहमदनगर, धुळे

अहमदनगर जिल्ह्यात एकूण 32 लाख 52 हजार 514 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 24 लाख 10 हजार 016 जणांनी पहिला डोस घेतला असून 08 लाख 42 हजार 498 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. धुळे जिल्ह्यात एकूण 14 लाख 32 हजार 592 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 09 लाख 79 हजार 876 जणांनी पहिला डोस घेतला असून 04 लाख 52 हजार 716 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

जळगाव, नंदुरबार

जळगाव जिल्ह्यात एकूण 27 लाख 09 हजार 094 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 20 लाख 36 हजार 779 जणांनी पहिला डोस घेतला असून 06 लाख 72 हजार 315 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकूण 10 लाख 28 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 07 लाख 710 जणांनी पहिला डोस घेतला असून 03 लाख 27 हजार 292 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

इतर बातम्याः

नाशिक महापौर पदाचा उमेदवार कोण, आमदार कांदेंना महाराष्ट्राबाहेरून धमक्या, राऊतांचे दिवाळीआधीच फटाके!

साहित्य संमेलन 3 डिसेंबरपासूनच; संमेलन स्थळ नाशिक बाहेर नेल्याने प्रकाशकांमध्ये नाराजी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.