चोरपांग्राचं नाव वीरपांग्रा, शहीद नितीन राठोड यांना गावकऱ्यांची श्रद्धांजली

बुलडाणा : पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले बुलडाणा जिल्ह्यातील सीआरपीएफचे जवान नितीन राठोड यांच्या स्मृती कायम राहाव्या यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतलाय. त्यांच्या गावाचं नाव चोरपांग्रा आहे. हे नाव बदलून वीरपांग्रा ठेवावं, अशी मागणी करणारा ठराव ग्रामपंचायतीने एकमुखाने मंजूर करुन घेण्यात आलाय. सरकारकडे हा अहवाल पाठवला जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने प्रस्ताव मान्य करुन महसुली नकाशावरही वीरपांग्रा …

चोरपांग्राचं नाव वीरपांग्रा, शहीद नितीन राठोड यांना गावकऱ्यांची श्रद्धांजली

बुलडाणा : पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले बुलडाणा जिल्ह्यातील सीआरपीएफचे जवान नितीन राठोड यांच्या स्मृती कायम राहाव्या यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतलाय. त्यांच्या गावाचं नाव चोरपांग्रा आहे. हे नाव बदलून वीरपांग्रा ठेवावं, अशी मागणी करणारा ठराव ग्रामपंचायतीने एकमुखाने मंजूर करुन घेण्यात आलाय. सरकारकडे हा अहवाल पाठवला जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने प्रस्ताव मान्य करुन महसुली नकाशावरही वीरपांग्रा असं नाव बदलून घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.

पुलवामा येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण आलं होतं. त्यामध्ये मलकापूर येथील संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्रा (गोवर्धन नगर) येथील वीर जवान नितीन राठोड यांचा समावेश होता. चोरपांग्रा गावासह संपूर्ण जिल्ह्यावर या घटनेने शोककळा पसरली होती. जवानाने देशासाठी बलिदान दिले त्यामुळे या हुतात्मा जवानाच्या स्मृती कायम राहाव्या, यासाठी गावाचे नाव बदलण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला.

गेल्या आठवड्यात 26 फेब्रुवारीला ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ग्रामसभेत गावाचे नाव बदलण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत असल्याचं समोर आल्यावर गावाचे नाव बदलून चोरपांग्रा ऐवजी वीरपांग्रा असे नामकरण करावे, असा ठराव ग्रामस्थांनी घेतला. ग्रामपंचायतीकडूनही सरकारकडे यासाठी कागदोपत्री पाठपुरावा केला जाणार आहे.

शहीद जवान नितीन राठोड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या गावाचे नाव बदलावे म्हणून ग्रामस्थांनी एकमताने तसा ठराव सर्वानुमते मंजूर केला. तेरवीच्या दिवशीच शहीद नितीन राठोड यांना एकप्रकारे आगळीवेगळी श्रद्धांजलीच वाहिली असल्याचं मत ग्रामस्थ व्यक्त करतात. शिवाय सर्वानुमते ठराव झाल्याने कोणाचाही विरोध नाही, यामुळे ग्रामस्थांना याचा आनंद आहे. तर हा ठराव सरकारने तात्काळ मंजूर करून त्यांच्या गावाचे नाव बदलून महसुली नकाशावर आणावे अशी मागणीही ग्रामस्थ करत आहेत.

चोरपांग्रा येथील ग्रामस्थ बाहेर गावी गेले तर त्यांना लोक या नावाबद्दल विचारत असतात. मात्र त्यांच्याकडे उत्तर नसायचं आणि त्यामुळे ग्रामस्थांना प्रश्न पडायचा. कारण याबद्दल कोणालाच काहीही माहिती नाही, की त्यांच्या गावाचे नाव चोरपांग्रा का पडले? गावात कुणीही चोरी करणारे नाही. मग बाहेरगावी गेल्यावर गावाचे नाव चोरपांग्रा न म्हणता पांग्रा म्हणायचे आणि चोर हा शब्द लपवला जायचा. मात्र आता वीरपांग्रा हे नाव गावाला दिलं तर लोकही त्यांना याबद्दल विचारणार नाहीत. शिवाय संपूर्ण देशभर नावही होईल म्हणून सरकारने तात्काळ दखल घेऊन शासनाच्या दफ्तारी नोंद घेऊन नावात बदल करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत सर्वच स्तरातून होत आहे. ग्रामस्थांनी हा ठराव घेऊन गावातील हुतात्मा जवानाला एक आगळीवेगळी श्रद्धांजली दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *