आधी बस, आता ट्रक, आंबेनळी घाटात पुन्हा भीषण दुर्घटना

रायगड: पोलादपूर ते सातारादरम्यान आंबेनळी घाटत पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. आंबेनळी घाटात ट्रक दरीत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. ट्रकचालक प्रशांत जाधव आणि क्लीनर शेख अशी मृतांची नावं आहेत. आंबेनळी घाटातील अवघड वळण, तसंच संरक्षक कठडे नसल्यानेच अपघात घडल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी पोलादपूर आणि महाबळेश्वर पोलीस तसंच …

आधी बस, आता ट्रक, आंबेनळी घाटात पुन्हा भीषण दुर्घटना

रायगड: पोलादपूर ते सातारादरम्यान आंबेनळी घाटत पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. आंबेनळी घाटात ट्रक दरीत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. ट्रकचालक प्रशांत जाधव आणि क्लीनर शेख अशी मृतांची नावं आहेत. आंबेनळी घाटातील अवघड वळण, तसंच संरक्षक कठडे नसल्यानेच अपघात घडल्याचे समोर आले आहे.

अपघातानंतर घटनास्थळी पोलादपूर आणि महाबळेश्वर पोलीस तसंच ट्रेकर्सनी धाव घेतली.

महाबळेश्वर येथून फरशी वाहून नेणारा ट्रक दाट धुक्यामुळे पहाटे बावलीकोडं इथे दरीत कोसळला. या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर येथील ट्रेकर्सना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने ट्रेकर्स दरीत उतरले आणि दोन मृतदेह ट्रकमधून बाहेर काढून, वर आणले. ट्रेकर्सनी हे मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिले.

काही दिवसांपूर्वीच दापोली कृषी विद्यापाठाची सहलीची बस आंबेनळी घाटात कोसळून 30 जणांचा मृत्यू झाला होता. या थरारक अपघाताच्या भीषण आठवणी अद्याप ताज्या असताना, त्या भागातच पुन्हा ट्रक कोसळल्याने, बस दुर्घटनेची आठवण पुन्हा अधोरेखित झाली.

ही अपघाताची मालिका थांबावी यासाठी संरक्षक कठडे बांधावे अशी मागणी सातत्याने होत असताना, प्रशासन याबाबत कधी पावलं उचलणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *