छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेसमोर येण्याची गरजः छगन भुजबळ

छत्रपती संभाजी महाराज यांचा आज 341 राज्यभिषेक सोहळा पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे संपन्न झाला

  • रणजित जाधव, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड
  • Published On - 16:07 PM, 16 Jan 2021
छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेसमोर येण्याची गरजः छगन भुजबळ

पुणेः ”छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जनतेसमोर येण्याची आता खरी गरज आहे”, असं राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणालेत. आजपर्यंत नाटक, सिनेमांतून, पुस्तकातून पाहायला मिळणारा छत्रपती राजवटीच्या शौर्याचा खरा इतिहास आता जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे छगन भुजबळ म्हणालेत. (True History Of Chhatrapati Shivaji Maharaj Needs To Come Before The People Says Chhagan Bhujbal)

छत्रपती संभाजी महाराज यांचा आज 341 राज्यभिषेक सोहळा पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे संपन्न झाला, त्याला राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती दर्शवली. छगन भुजबळ छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी भेट देत नतमस्तक झाले, यासह अनेक शंभू भक्त ही या वेळी नतमस्तक होण्यासाठी उपस्थित होते. त्यावेळी छगन भुजबळांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. विशेष म्हणजे त्यांनी धनंजय मुंडेंच्या प्रकरणासंदर्भात विचारले असता, त्यांनी अधिक बोलणे टाळले.

धनंजय मुंडे प्रकरणावर बोलण्यास छगन भुजबळांची टाळाटाळ
धनंजय मुंडे प्रकरणावर बोलत असताना तक्रारदार महिलेच्या विरोधात अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यामुळे जनतेने ठरवावे की धनंजय मुंडे प्रकरणात कसे पाहावे, असे म्हणत मुंडे प्रकरणावर बोलण्यास छगन भुजबळ यांनी टाळाटाळ केली.

त्या महिलेविरुद्ध 4 ते5 लोकांनी तक्रारी केल्यातः छगन भुजबळ
विशेष म्हणजे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती. “धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते बोलले आहेत. फक्त कुणावर अन्याय होता काम नये. त्या महिलेविरुद्ध 4 ते5 लोकांनी तक्रारी केल्या आहेत. यावरून जनतेने समजून घेतलं आहे,” असं अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या

कृषीमंत्री आणि अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यात अवकाळी पावसानं बळीराजा दुहेरी संकटात

Dhananjay Munde Case | ‘मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही’, गुलाबराव पाटील मैदानात

True History Of Chhatrapati Shivaji Maharaj Needs To Come Before The People Says Chhagan Bhujbal