दोन दिवसांचा जनता कर्फ्यू झाला, आता पुढे काय? तुकाराम मुंढे म्हणतात….

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागपुरात दोन दिवसांसाठी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे (Tukaram Mundhe on Nagpur Lockdown).

दोन दिवसांचा जनता कर्फ्यू झाला, आता पुढे काय? तुकाराम मुंढे म्हणतात....
Follow us
| Updated on: Jul 26, 2020 | 1:22 PM

नागपूर : “नागरिकांनी दोन दिवस जसा प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद आणखी पुढचे काही दिवस दिला तर नागपुरात लॉकडाऊनची वेळ येणार नाही (Tukaram Mundhe on Nagpur Lockdown). पण नागरिकांकडून नियमांचं पालन केलं गेलं नाही, तर लॉकडाऊनचा विचार करावा लागेल”, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली (Tukaram Mundhe on Nagpur Lockdown).

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागपुरात दोन दिवसांसाठी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूला शनिवारी (25 जुलै) नागपुरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. याशिवाय आजही नागरिकांनी तसाच प्रतिसाद आहे. या जनता कर्फ्यूनंतर पुढे काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. या प्रश्नाचं उत्तर तुकाराम मुंढे यांनी दिलं आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“जनता कर्फ्यूला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या दोन दिवसांच्या कर्फ्यूप्रमाणेच नागरिकांनी आपली जीवनशैली बदलावी. नागरिकांनी नियमांचं पालन करावं”, असं आवाहन तुकाराम मुंढे यांनी केलं.

“दोन दिवस जनता कर्फ्यू झाला. आता नागपुरात प्रशासनाची कडक नजर राहील. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस आणि प्रशासनाकडून कारवाई केली जाईल”, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“उद्यापासून नियमांचं पालन करा, दिलेल्या वेळेत दुकान उघडा, गरज असेल तरच घराबाहेर पडा. मात्र नियमांचं पालन करा. बाजारात फक्त गरजेपुरताच जा”, असंदेखील आवाहन तुकाराम मुंढे यांनी नागपुरकरांना केलं.

“नागपुरकरांनी तब्येतीची काळजी घ्यावी. थोडे जरी लक्षणे आढळले तर प्रशासनाला माहिती द्यावी. काही लोक तब्येत जास्त बिघडल्यावर येतात. त्यामुळे नागपुरात मृत्यू संख्या वाढली”, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.

नागपुरात जनता कर्फ्यूदरम्यान शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. शनिवारी पहिल्या दिवशी शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, कार्यालये, आस्थापने स्वयंस्फूर्तीने बंद होती. शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. पण, पोलीस कुणावरही बळजबरी करताना दिसून आले नाहीत.

हेही वाचा :

संघर्षानंतर नागपूरचे महापौर-आयुक्त पहिल्यांदाच एकत्र, दोन दिवस जनता कर्फ्यू, 4 दिवस लोकप्रतिनिधी रस्त्यावर

तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये, रस्त्यावर उतरुन दुकानांवर कारवाई, पीपीई किट घालून थेट कोरोना वॉर्डात

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.