नागपूर स्मार्ट सिटीचे सीईओपद तुकाराम मुंढेंकडून काढले, तीन तासांच्या बैठकीत वादळी चर्चा

तुकाराम मुंढेंवर स्मार्ट सिटी घोटाळ्याच्या मुद्द्यांवर भाजपने अनेक प्रश्न उपस्थित केले. या सर्व मुद्द्यांवर तब्बल तीन सातापेक्षा जास्त काळ चर्चा झाली.

नागपूर स्मार्ट सिटीचे सीईओपद तुकाराम मुंढेंकडून काढले, तीन तासांच्या बैठकीत वादळी चर्चा

नागपूर : नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून नागपूर स्मार्ट सिटी सीईओपदाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. महेश मोरोने यांना नागपूर स्मार्ट सिटीचे प्रभारी सीईओपद देण्यात आले आहे. (Tukaram Mundhe removed as Nagpur Smart City CEO)

तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश मोरोने काम करतील. तर काही दिवसांत पूर्ण वेळ सीईओ नेमण्यासाठी जाहिरात काढली जाणार आहे. नागपूर स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.

जवळपास तीन तासापेक्षा जास्त काळ नागपूर स्मार्ट सिटी संचालक मंडळाची झंझावाती मीटिंग चालली. या बैठकीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, महापौर संदीप जोशी, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, एनआयटी चेअरमन उपस्थित होते. चोख पोलीस बंदोबस्तात ही बैठक पार पडली.

हेही वाचा : आयुक्त-महापौर वाद शमेना, तुकाराम मुंढेंनी कंत्राटदाराला 18 कोटी कसे दिले? नागपूरच्या महापौरांचा सवाल

तुकाराम मुंढेंवर स्मार्ट सिटी घोटाळ्याच्या मुद्द्यांवर भाजपने अनेक प्रश्न उपस्थित केले. या सर्व मुद्द्यांवर तब्बल तीन सातापेक्षा जास्त काळ चर्चा झाली. “आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीचं संचालकपद आणि सीईओपद बेकायदा बळकवल्याचं आजच्या बैठकीत सिद्ध झालं” असं नागपूरचे महापौर संदीप जोशी बैठकीनंतर म्हणाले.

तुकाराम मुंढे यांनी नागपूर स्मार्ट सिटी सीईओपदाची धुरा अवैधरित्या बळकावल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट केंद्र सरकारकडे तक्रार केली होती. त्यानंतर भाजपने मुंढे यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली होती.

नितीन गडकरींच्या पत्रात नेमकं काय?

‘नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’चे सीईओ तुकाराम मुंढे यांचे वर्तन अवैध, असंवैधानिक, आणि घोटाळेबाज असल्याचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी सांभाळणारे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना लिहिले आहे.

तुकाराम मुंढे यांनी नागपूर महापालिका आयुक्त म्हणून धुरा खांद्यावर येताच ‘नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या सीईओपदाची जबाबदारी अवैधरीत्या बळकावल्याचा आरोप गडकरींनी केला आहे.

निविदा रद्द करणे, कोरोनासारख्या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांना टर्मिनेट करणे असे निर्णय मुंढे यांनी घेतल्याचा दावाही गडकरींनी पत्रात केला आहे.

तुकाराम मुंढेंचा खुलासा 

“मी मनपा आयुक्त म्हणून 28 जानेवारी 2020 रोजी रुजू झालो. मनपा आयुक्त हे स्मार्ट सिटी (SPV) चे पदसिद्ध संचालक आहेत. रामनाथ सोनावणे हे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत होते. त्यांनी दिनांक 11 फेब्रुवारी 2020 रोजी या पदाचा राजीनामा  प्रविणसिंह परदेशी चेअरमन यांच्याकडे सुपूर्द केला.

नागपूर स्मार्टसिटीचे चेअरमन यांनी मला मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी नागपूरचा कार्यभार सांभाळण्यासाठी मोबाईलवर निर्देश दिलेत. त्यानुसार आणि शासन निर्णयानुसार आजपर्यंत मी सदर पदाचा कार्यभार सांभाळत आहे. स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा कार्यभार सांभाळताना मी दैनंदिन कामकाज पार पाडत आहे. सदर कालावधीत Transfer Station चे टेंडर रद्द करुन Bio Mining चे टेंडर जाहीर केले होते. सदर टेंडर रद्द करताना आणि Bio Mining चे टेंडर जाहीर करताना चेअरमन यांच्याशी चर्चा करुनच केलेले आहे. सदर जाहीर केलेले Bio Mining चे टेंडर अजूनही अंतिम झालेले नाही. सदर दोन्ही बाबी संचालक मंडळाच्या प्रस्तावित बैठकीत ठेवण्यात येत आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

त्याचबरोबर कंपनीतील कर्मचाऱ्यांचे Annual Performance Appraisal नुसार आढावा घेऊन काही कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. वरील सर्व बाबी संचालक मंडळाच्या प्रस्तावित बैठकीत ठेवण्यात येत आहे.

या काळात कार्यालयीन खर्च आणि वेतनाच्या देयकाशिवाय केवळ एकच Running Bill देण्यात आले आहे. सदर बिल (Bill) यापूर्वीच मंजूर केलेल्या कामाचे व करार झालेल्या कंत्राटदराचे, त्यांनी केलेल्या कामाचेच आहे. यामध्ये कोणतीही आर्थिक अनियमितता झालेली नाही.

याविषयी CEO म्हणून काम करीत असताना कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही. संचालक मंडळाची बैठक कोरोनाच्या परिस्थितीमुळे होऊ शकलेली नाही. सदर बैठक प्रस्तावित आहे” असा खुलासा नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या : 

Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांची केंद्र सरकारकडे तक्रार, नितीन गडकरींचे पत्र

तुकाराम मुंढेंवर 20 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, महापौरांकडून पोलिसात तक्रार दाखल

(Tukaram Mundhe removed as Nagpur Smart City CEO)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *