तुळजाभवानी देवीच्या दर्शन पासची संख्या वाढली, पेड दर्शनाची रक्कमही कमी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळख असलेल्या तुळजाभवानी मातेच्या भक्तांसाठी दिलासादायक बातमी आहे. देवीच्या मोफत दर्शन पासची संख्या वाढवण्यात आलीय.

तुळजाभवानी देवीच्या दर्शन पासची संख्या वाढली, पेड दर्शनाची रक्कमही कमी


उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळख असलेल्या तुळजाभवानी मातेच्या भक्तांसाठी दिलासादायक बातमी आहे. देवीच्या मोफत दर्शन पासची संख्या वाढवण्यात आलीय. कोरोना संकट असल्याने मंदिर संस्थाने दररोज 12 हजार इतक्या मर्यादीत स्वरूपात पास दिले होते. मात्र, भाविकांची मोठी गर्दी पाहता आता मोफत पासची संख्या वाढवण्यात आलीय (Tuljabhavani Trust increase pass number to visit more Devotees in Osmanabad).

देवीच्या दर्शनासाठी मंगळवार, शुक्रवार आणि रविवार अशा 3 दिवशी मोठी गर्दी असते. त्यामुळे या 3 दिवशी आणि महत्वाचे सण, उत्सव या दिवशी 30 हजार मोफत पास दिले जाणार आहेत. हे 3 दिवस वगळता इतर दिवशी 20 हजार भाविकांना दर्शन पास दिले जाणार आहेत. सध्या आता दररोज 12 हजार भक्तांना मोफत दर्शन पास दिला जात होता. त्यामुळे सकाळपासूनच भक्तांच्या रांगा लागत होत्या, तर सकाळी 11 वाजताच पासची मर्यादा संपत होती. त्यामुळे अनेक भाविकांच्या पदरी निराशा लागत होती. मात्र आता पास संख्या वाढवल्याने भाविकांना दर्शनाचा लाभ मिळणार आहे.

दर्शन पासची संख्या वाढवण्यासोबतच पेड दर्शन पासची रक्कम 300 वरून 200 रुपये केली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंदीर विश्वस्त समिती बैठकीत हे निर्णय घेण्यात आले, अशी माहिती मंदिर व्यवस्थापक आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिली. तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र उत्सव यशस्वीरित्या पार पडला असून मंदिर सुरू झाल्याने हळुहळु इथली अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे.

कोरोना संकट असल्याने तुळजाभवानी मंदिर परिसरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. तुळजाभवानी मंदिर सुरू झाल्याने भाविकांना मात्र मोठा दिलासा मिळालाय. या मंदिर विश्वस्त बैठकीला आमदार राणाजगजीतसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मंदिरचे जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे इत्यादी लोक उपस्थित होते.

हेही वाचा :

अनलॉकनंतर 71 दिवसांत साई चरणी 32 कोटीचं दान, तर तुळजाभवानी मंदिरात दर्शन पासची संख्या वाढवली 

“आई राजा उदो उदो”च्या गजरात तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ

तुळजापुरात पहिल्याच दिवशी प्रवेशबंदीचं उल्लंघन, मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी

व्हिडीओ पाहा :

Tuljabhavani Trust increase pass number to visit more Devotees in Osmanabad