TV9 च्या बातमीची दखल, बोगस बियाणे कंपन्यांना झटका, महाबीजसह अन्य कंपन्यांवर 46 गुन्हे दाखल

बोगस बियाणे कंपन्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा झटका दिला आहे (FIR against defaulted seed company Aurangabad).

TV9 च्या बातमीची दखल, बोगस बियाणे कंपन्यांना झटका, महाबीजसह अन्य कंपन्यांवर 46 गुन्हे दाखल

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपूर्ण हंगामातील मेहनत मातीमोल करणाऱ्या बोगस बियाणे कंपन्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा झटका दिला आहे (FIR against defaulted seed company Aurangabad). बोगस बियाणे प्रकरणी महाबीज कंपनीसह अनेक कंपन्यांवर तब्बल 46 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच इतर 53 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. सुमोटो याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने विक्रेत्यांसह दोषी कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

बोगस बियाणे प्रकरणी आतापर्यंत जवळपास 49 हजार 337 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याबाबत टीव्ही 9 मराठीने केलेल्या वृत्तांकनाची दखल घेऊन न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली. या याचिकेवरील सुनावणीवेळी कृषी संचालक आणि सहसंचालक देखील न्यायालयात हजर झाले.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, याआधी याचिकेच्या सुनावणीच्या वेळी कृषी विभागाकडून गांभीर्य न दाखवल्याने न्यायालयाने कृषी सहसंचालकांना स्वतः हजर राहण्याचे आदेश दिले होते. तसेच हजर न राहिल्यास थेट अटक करण्याचा इशाराही दिला होता. न्यायालयाने कृषी सहसंचालकांना 13 जुलै रोजी न्यायालया समोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. कृषी सहसंचालक हजर न राहिल्यास न्यायालयाने थेट त्यांच्या अटकेचे आदेश देण्याचा इशारा दिला होता.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

औरंगाबाद उच्च न्यायालयाने बोगस बियाणे प्रकरणी कडक पाऊलं उचलल्यानंतर बोगस बियाणे विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम आणि मेहनत खराब करुन त्यांना अडचणीत टाकणाऱ्या बोगस बियाणांच्या कंपन्या आधी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत होत्या. मात्र, आता थेट उच्च न्यायालयानेच शेतकऱ्यांची बाजू घेतल्याने संबंधित कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा : 

Wardha Farmers | पेरलं ते उगवलंच नाही! वर्ध्यात बोगस बियाणाने शेकडो एकरवरील सोयाबीन पेरणी बाद

बोगस बियाणे प्रकरणी उच्च न्यायालय आक्रमक, कृषी सहसंचालकांना अटकेचा इशारा

TV9 IMPACT | ‘टीव्ही 9’च्या बातमीची हायकोर्टाकडून दखल, बोगस बियाणेप्रकरणी राज्य सरकारला नोटीस

FIR against defaulted seed company Aurangabad

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *