Maharashtra Political News Headlines 4 Aug 2024 : मोठी बातमी! 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार
TV9 Marathi, Maharashtra Political News Headlines 3 Aug 2024 : आज 4 ऑगस्ट 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या अनेक राजकीय नेते विविध जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. तर चंद्रकांत पाटील हे आज अमरावती दौऱ्यावर आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आज सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत. यामुळे अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसणार आहेत. तर दुसरीकडे पुणे, नाशिक, सातारा, सांगली या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी पूरस्थिती पाहायला मिळत आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार
98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत मराठीचा आवाज घुमणार आहे. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम हे संभाव्य स्थळ असू शकणार आहे. दिल्लीत गेल्या 70 वर्षात पहिल्यांदाच दिल्लीला साहित्य संमेलन होणार आहे. पुण्याच्या सरहद संस्थेकडे व्यवस्थापनाची जबाबदारी असणार आहे.
-
भाजपचे शिष्टमंडळ अयोध्येत पोहोचले, बलात्कार पीडितेची भेट घेतली
भाजपच्या शिष्टमंडळाने आज अयोध्येत बलात्कार पीडितेची भेट घेतली. भाजपचे राज्यसभा खासदार बाबू राम निषाद आणि यूपी सरकारचे मंत्री नरेंद्र कश्यप आज अयोध्येला पोहोचले. दोघेही पहिल्यांदा बलात्कार पीडितेच्या आई आणि बहिणीला त्यांच्या भदरसा येथील घरी भेटले. त्यानंतर दोन्ही भाजप नेत्यांनी रुग्णालयात जाऊन बलात्कार पीडितेची भेट घेतली.
-
-
आसनसोलमध्ये दामोदर नदीवर बांधलेला तात्पुरता पूल वाहून गेला
पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसामुळे आसनसोलमध्ये दामोदर नदीवर बांधलेला तात्पुरता पूल वाहून गेला आहे. पूल वाहून गेल्याने स्थानिकांना त्रास होत आहे.
-
सत्य सर्वांना माहिती आहे ते समोर आलं- फडणवीस
परमबीर सिंह यांना मविआनेच आयुक्त केलं. परमबीर सिंहांनी देशमुख गृहमंत्री असताना आरोप केले. सत्य सर्वांना माहिती आहे ते समोर आलं आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
-
विरोधक वाट्टेल ते करू शकतात, 2029 मध्ये एनडीए येईल: अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चंदीगडला पोहोचले आणि विरोधकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मी तुम्हाला आश्वासन देतो की विरोधकांना जे हवे ते करू द्या, 2029 मध्ये एनडीए येईल, मोदीजी येतील.
-
-
अयोध्येतील मोईद खानच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सवर बुलडोझर चालणार
अयोध्या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी मोईद खान याच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेली दुकाने रिकामी करण्यात आली आहेत. शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या तपासणीत मागील भाग बेकायदेशीर असल्याचे आढळून आले. या इमारतीत पंजाब नॅशनल बँकेसह 12 दुकाने चालतात. महसूल विभागाने केलेल्या तपासणीत तलावाच्या जागेवर कब्जा करून शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधल्याचे निष्पन्न झाले आहे.
-
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस
नाशिक शहर आणि धरणं परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. गंगापूर धरणातुन पाण्याचा विसर्ग देखील वाढवला आहे. 4 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सुरू आहे. गंगापूर सह दारणा,पालखेड,कडवा,पुनद नांदूरमाध्यमेश्वर धरणांतून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट आज देण्यात आला आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी कादवा, दारणा, या नद्यांसह छोट्या-मोठ्या नद्यांच्या पाणी पातळी देखील वाढ झाली आहे. गोदावरी आणि दारणा नदीकाठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकच्या रामकुंड परिसरात असलेल्या अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा पाहायला मिळत आहे.
-
आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात खडाजंगी
अमरावतीच्या अचलपूर मधील फिनले मिल वरून आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात खडाजंगी झाली आहे. अमरावती जिल्हा नियोजन बैठकित पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर खडाजंगी झाली. फिनले मिल वरून दोन आमदारामध्ये श्रेयवादाची लढाई सुरु आहे.
-
शिंदे गट आणि भाजपमध्ये जुंपली…
कल्याण पूर्व पाठोपाठ डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपात जुंपली. महामार्गावरून महायुतीत जुंपली. मुंबई गोवा महामार्गाच्या कामासाठी श्रीकांत शिंदेनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हा प्रमुखाने केली होती. खुजल्या आणणारे राजकारण करू नका. आमच्या नेत्या विषयी वाईट बोलाल तर आम्ही सोडनार नाही, असं भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिवसेना शिंदे गटाला इशारा दिला आहे.
-
मृत्यूनंतरही मरण यातना…
अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यासाठी गुडघाभर चिखलातून कसरत करावी लागत आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे पाथरवाला येथील हा प्रकार आहे. स्मशानभूमीकडे जाण्यास रस्ता नसल्याने मृत्यूनंतर ही शवाचे हाल होत आहेत. खांदेकऱ्याना देखील चिखलातून जाताना सोबतच्या नागरिकांचा आधार घ्यावा लागत होता. स्वातंत्र्य भारतानंतरही रस्ता नसल्याने नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.
-
दहिसरमध्ये सोसायटीच्या अध्यक्षाने सदस्याचा अंगठा कापला
मुंबईतील दहिसर पश्चिम म्हात्रे वाडी येथील अमरनाथ अपार्टमेंटमध्ये आज सकाळी सोसायटीची बैठक सुरू असताना सोसायटीचे सदस्य आदित्य देसाई यांचा सोसायटीचे अध्यक्ष नित्यानंद परिहार यांच्याशी वाद सुरू झाला.पीडित आदित्य देसाईने सोसायटीचे अध्यक्ष नित्यानंद परिहार यांच्यावर आरोप केला की, भांडणाच्या वेळी त्यांनी अंगठा चावून त्याचे दोन तुकडे केले.
-
जुनी पेन्शन योजनेसाठी शिक्षकांचे आंदोलन
जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यासाठी सांगलीमध्ये आज शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे शहरातल्या विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत करण्यात आलेल्या मोर्चा शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
-
रामकुंड परिसरातून एक पर्यटक गेला वाहून
रामकुंड परिसरातून एक पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली आहे. गोदावरी नदी परिसरात पूर परिस्थिती आहे. रामकुंड परिसरात दर्शनासाठी आलेला पर्यटक वाहून गेला. प्रशासनाकडून वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध सुरू आहे. नाशिक पोलिसांकडून रामकुंडा परिसरातील नागरिकांना हटवण्याचे काम सुरू आहे.
-
लाडकी बहीण योजनाविषयी भुजबळांचे मोठे वक्तव्य
रक्ताचा थेंब शेवट पर्यतअसे पर्यत महायुती सरकार लाडकी बहीण योजना सुरुच ठेवणार असल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. लाडकी बहीण योजना मविआ सरकार आले तर बंद होईल, असा दावा त्यांनी केला.
-
मुख्यमंत्री नितीश कुमार यांना धमकी
मुख्यमंत्री नितीश कुमार यांना धमकी देण्यात आली आहे. अल-कायदाकडून मेल करुन बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. बिहारचे विशेष पोलिसही काही करू शकणार नाहीत असा मेलमध्ये उल्लेख आहे.
-
आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी सन्मान यात्रा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ मनपाने बांधलेल्या डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन नवनिर्मितीसाठी सन्मान यात्रा काढण्यात आली.आंबेडकरी विचाराचे नागरिक सहभागी झाले आहेत. नागपुरातील या स्मारकासाठी अनेक दिवस उपोषण करण्यात आलं होतं. आज भूमिपूजन झालं नाही तर आम्ही स्वतः या ठिकाणी गेट उघडून भूमिपूजन करणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
-
योगेश टिळेकर यांचे मोठे विधान
आजच्या भक्त निवासाच्या निमित्ताने देवेद्र फडणवीस व छगन भुजबळांना माळी समाज कधीच विसरणार नाहीय, असे योगेश टिळेकर यांनी म्हटले.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अजित पवारांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन
सकाळीच फोनवरून घेतली माहिती. सगळ्या विभागाचे कर्मचारी तयार ठेवा मुख्यमंत्र्यांच्या सूचना.
-
लोणावळा परिसरात धोधो पाऊस सुरू
लोणावळा परिसरात धोधो पाऊस सुरू असल्याने सकल भागात पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले आहेत. नांगरगाव रस्ता देखील पाण्याखाली गेला आहे.
-
Maharashtra News: पुण्यातील सिंहगड रस्त्यावर साचलं पाणी
पुण्यातील सिंहगड रस्त्यावर साचलं पाणी… पुण्यातील अनेक मुख्य रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात… पुण्यात अजूनही पावसाची संतत धार सुरूच
-
Maharashtra News: मुंबईतील लिला हॉटेलमध्ये क्राँग्रेसची जागावाटपासंदर्भात बैठक सुरु
मुंबईतील लिला हॉटेलमध्ये क्राँग्रेसची जागावाटपासंदर्भात बैठक सुरु… काँग्रेसच्या रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत बैठक सुरु… पटोले, थोरात, पृथ्वीराज चव्हण, सतेज पाटील देखील उपस्थित…
-
Maharashtra News: लोणावळ्याच्या कार्ला गडावर पावसाच्या पाण्याने हाहाकार
लोणावळ्याच्या कार्ला गडावर पावसाच्या पाण्याने हाहाकार… कार्ला गडाच्या पायरी मार्गावर कंबरभर पाणी… एकविरा देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांनी पाण्यातून वाट काढली… लोणावळ्यात कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात…
-
Maharashtra News: नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू…. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संतत धार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ… गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू… ५०० क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग
-
Maharashtra News: शरद पवार पुण्यातील मोदी बागेत
शरद पवार मोदी बागेत… आज सकाळपासून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत…. आज दुपारपर्यंत शरद पवार पुण्यात असणार आहेत… दुपारी 4 वाजता दिल्लीला जाणार आहेत…
-
सिंहगड रस्त्यावरील एकतानगरात पाणी भरायला सुरुवात
सिंहगड रस्त्यावरील एकतानगरात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. द्वारका सोसायटी पूर्ण रिकामी करण्यात आली. ३५ हजार क्यूसेकने पाणी सोडल्याने पाणीपातळी वाढायला सुरुवात झाली आहे. काही भागातील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.
-
पुण्यातील पूरस्थितीच्या शक्यतेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलर्टवर
धोकादायक पूररेषेच्या आतील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. पुण्यातील पूरस्थितीच्या शक्यतेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलर्टवर आहेत.
-
मी ओबीसीतूनही मराठा आरक्षण घेणार- जरांगे पाटील
“मी नारायण राणेंवर बोलत नाही. राणेंनी मला फुकट धमक्या द्यायच्या नाहीत. मी ओबीसीतूनही मराठा आरक्षण घेणार. 29 ऑगस्टला विधानसभेसंदर्भात निर्णय होईल. 288 जागांसाठी कागदपत्रं तयार करतोय,” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
पुणे शहरासह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस
पुणे जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पुणे शहरासह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या अर्ध्या तासापासून पुणे शहरातील सर्व भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याकडून शहराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
-
राज ठाकरे पुण्यातील एकतानगरमध्ये दाखल
राज ठाकरे हे पुण्यातील एकतानगरमध्ये दाखल झाले असून तिथल्या नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत. काही दिवसांपूर्वी एकतानगरला पुराचा फटका बसला होता.
-
पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता
पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. धरण क्षेत्र आणि घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर पवना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याच पवनेचं पाणी पिंपरी चिंचवडकर यांचं श्रद्धास्थान असलेला मोरया गोसावी मंदिरामध्ये साचायला सुरुवात झाली आहे. सध्या पवना धरणातून 7,070 क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्यामुळे, मुख्य संजीवन समाधी मंदिराच्या पायरीला हे पाणी पोहोचले आहे. दरम्यान सकाळी दहाच्या सुमारास विसर्ग अजून वाढवण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. त्यामुळे हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
Maharashtra news : श्रीमंत कोकाटे अन् जरांगे पाटील यांची भेट
इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे हे जरांगे पाटील यांच्यात भेट झाली आहे. या भेटीत श्रीमंत कोकाटे यांनी जरांगे पाटील यांच्याशी मराठा आरक्षणावर चर्चा केली. तसेच श्रीमंत कोकाटे यांनी जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-
Maharashtra news : शाळांसाठी ५१ लाखांचे बक्षीस
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या अभियानामुळे भौतिक फायद्यापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन सकारात्मक बदल निदर्शनास आले आहे. त्यासाठी स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळावू म्हणून शाळा सुंदर, टापटीप बनवा, ५१ लाखांचे बक्षीस मिळवा, असा उपक्रम सुरु आहे.
-
Maharashtra news : नाशिकचे पाणी जायकवाडीसाठी सोडले
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी तालुक्यात पावसाची संततधार सुरूआहे. यामुळेदारणा, कडवा आणि पालखेड या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदी पात्रात 36 हजार 731 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
-
Maharashtra news : जायकवाडी धरणात जलसाठा वाढला
पैठण येथील जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरूच असल्याने दिवसेंदिवस या जलसाठ्यात आता वाढ होत आहे. सद्यस्थितीला या धरणाचा जलसाठा हा 10.35 टक्क्यावर पोहोचला असून 4 हजार 17क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी 1 हजार 499.03फूट आहे.
-
Maharashtra News : नितीन गडकरी आज महापालिकेत जनसंपर्क अभियान घेणार
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज जनसंपर्क अभियान महापालिकेत घेणार
गडकरी विधानसभा मतदारसंघनिहाय समस्या ऐकून घेणार आहेत.
गडकरी महापालिकेच्या सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहतील.
सकाळी ११ ते दुपारी ३या कालावधीत ते नागरिकांच्या मनपाशी संबंधित समस्यांची विधानसभानिहाय सुनावणी करतील.
-
Maharashtra news : कल्याण डोंबिवलीत पावसाची संततधार सुरु
कल्याण डोंबिवलीत रात्री पासून पावसाची संततधार सुरू
अधून मधून मुसळधार पाऊस पडत असल्याने सखल भागात पाणी सचण्यास सुरु
पावसाचा जोर कमी होताच सखल भागातील साचलेल्या पाण्याचा होत आहे निचरा
मात्र आज दिवसभर पाण्याचा जोर कायम राहिला तर सखल भाग जलमय होण्याची शक्यता
-
Maharashtra news : राज ठाकरे आज पुन्हा पुणे दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा पुणे दौऱ्यावर
पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगर मधील नागरिकांशी राज ठाकरे साधणार संवाद
काही दिवसांपूर्वी याच परिसरात पुरसदृश्य परिस्थिती झाली होती निर्माण
या भागाची पाहणी केल्यानंतर काल राज ठाकरेंनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची घेतली होती भेट
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीची माहिती देण्यासाठी राज ठाकरे आज पुन्हा एकता नगर मध्ये जाणार
-
Maharashtra news : इगतपुरी शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव भरले, दररोज पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी
इगतपुरी शहराला पाणीपुरवठा करणारे नगरपरिषदेचे तलाव शंभर टक्के भरले
गेल्या तीन ते चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तलाव भरले
तलाव ओसंडून वाहत असताना सांडव्याच्या वर्ण पाणी वाहू लागले
मात्र भर पावसाळ्यातही इगतपुरीकरांना सुरू आहे दिवसाआड पाणी
दररोज पाणीपुरवठा करण्याची इगतपुरी शहरवासीयांची मागणी
-
Maharashtra news : नागपुरात चिकनगुनियाचे रुग्ण वाढले
नागपूर : चिकनगुनिया सदृश्य आजाराचे शहरात रुग्ण वाढले
नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोन मध्ये 1 जानेवारी ते 1 ऑगस्टपर्यंत चिकनगुनिया रुग्णांचे शतक पूर्ण
तिथं चिकनगुनिया सदृश रुग्णांची गर्दी मेडिकलमध्येही होत आहे
यातील जवळपास 80 टक्के रुग्ण महिनाभरातील दिसून येते
महापालिकेने डेंग्यू आणि चिकनगुनिया रोखण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे
Published On - Aug 04,2024 9:52 AM